“कोरोना सत्य” लिहिलेले टोचले म्हणून भारतीय मासिकावर चीनमध्ये बंदी!


वृत्तसंस्था

बीजिंग : “कोरोनाचा जनक” म्हणत चीनचा बुरखा फडणाऱ्या स्वराज्य मासिकाच्या ऑनलाईन आवृत्तीवर चीनने बंदी आणली आहे, मात्र त्यावर सोशल मीडियातून चीनला जोरदार विरोध होऊ लागला आहे. China bans magazine which wrote truth of “corona super spreader”

कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून झाली आहे. मात्र धाकदपटशहा करून चीनने हे सत्य कायम दडपले आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना असो कि अमेरिका सारखी महासत्ता असो, कुणीही चीनवर असा आरोप केला, तरी चीनचे पित्त खवळते. पण चीन या आरोपाला इतके घाबरते कि, भारतातील ‘स्वराज्य’ या मासिकाने त्यांच्या अंकात मुखपृष्ठ कथा म्हणून “Super Spreader – China” ‘सुपर प्रेडर – चीन’ हे मुखपृष्ठ आणि लेख छापले, त्याचाही चीनने इतका धसका घेतला आहे की, चिनी कम्युनिस्ट राजवटीने या मासिकावरच बंदी आणली आहे.“आमच्या मासिकात चीनच्या भूमिकांचे सडेतोड भाषेत खंडण केले जाते. म्हणून चीनने याआधीही आमच्या ऑनलाईन आवृत्तीवर आक्षेप नोंदवले होते. आता चीनने आमच्या ऑनलाईन आवृत्तीवर बंदी आणली आहे.”, असे स्वराज्य मासिकाचे संपादक
आर. रंगनाथन यांनी सांगितले.

चीनला झोंबल्या मिरच्या!

भारतातील राष्ट्रवाद जपणारे हे ‘स्वराज्य’ नावाचे मासिका आहे. त्यामध्ये राजकारण, संरक्षण, अर्थकारण, सांस्कृतिक अशा विविध विषयांवरील बातम्यांचा समावेश केला जातो. अशा या मॅगझिनची सोशल मीडियातही विशेष चर्चा सुरु असते. या मॅगझिनमध्ये मुखपृष्ठ कथा म्हणून ‘सुपरस्प्रेडर – चीनला मिळाले संरक्षण, डब्लूएचओ चे होते संगनमत, जगाला समजण्याआधी मानवता आली धोक्यात’ अशा मथळ्याखाली हे सविस्तर वृत्त या मासिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुखपृष्ठावर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे छायाचित्र छापले आहे.

सोशल मीडियावरून चीनवर भडिमार

चीनला या मासिकातील या लेखावर वर आक्षेप असल्याने चीनने या मासिकावर बंदी आणली आहे. यावर आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीवर टीकेचा भडिमार करण्यात आला आहे. हा चीनचा खोटारडेपणा असून सत्य चीनला बोचत आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियामधून येऊ लागल्या आहेत.

China bans magazine which wrote truth of “corona super spreader”

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”