70 वर्षा नंतर चित्ते भारतात; मोदींच्या 72 व्या वाढदिवशी मिळाला अधिवास!


वृत्तसंस्था

कुनो : 70 वर्षानंतर चित्ते भारतात आणि मोदींच्या 72 व्या वाढदिवशी त्यांना मिळाला अधिवास!!, हे घडले आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला 72 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. आफ्रिकेच्या नामिबिया या देशातून आणलेले 8 चित्ते त्यांनी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडले आहेत. Cheetahs in India after 70 years Got domicile on Modi’s 72nd birthday

भारत भूमीतून 70 वर्षांहून अधिक काळ आधी चित्ते प्रजाती नामशेष झाली होती. अति शिकार आणि नंतर दुर्लक्ष यामुळे ही चित्ते प्रजाती भारत अजून नष्ट झाली होती पण आता या प्रजातीला पुन्हा भारतीय भूमीत अधिवास मिळावा म्हणून विशेष प्रयत्न करून भारत सरकारने आफ्रिका खंडातील नामिबिया आठ चित्ते खास जेट विमानातून भारतात आणले आहेत या चित्त्यांमध्ये 4 मादी आणि 3 नर यांचा समावेश आहे. या चित्त्यांच्या नामेबिया ते कुनो राष्ट्रीय अभयारण्य हा प्रवास अनोखा आहे. परंतु भारतातून लुप्त झालेली एक महत्त्वाची जंगली प्रजाती पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भारतात पुन्हा येऊन आपल्या जीवनाची रुजवात करते आहे, याला विशेष महत्त्व आहे!!

प्रोजेक्ट चित्ता

नामिबियातून आठ चित्ते भारतात आणले आहेत. यामध्ये 5 मादी आणि 3 नर आहेत.

नामिबियाहून विशेष बोईंग 747-400 विमानानं ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथे चित्त्यांचे आगमन झाले, तर ग्वाल्हेरहून चित्त्यांना हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्कमध्ये आणले.

सलग 20 तासांत 8,000 किलोमीटरचे अंतर कापून चित्ते भारतात पोहोचले आहेत.

नामिबियाच्या चित्ता संवर्धन विभागाचं (CCF) एक पथक चित्त्यांसोबत आहे. या सर्व चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय केली आहे.

कुनो नॅशनल पार्क हे 748 चौरस किलोमीटरवर पसरलेलं संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी 12 किलोमीटर लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येईल.



चित्त्यांसमोरील आव्हाने

भारतात आणलेल्या या चित्त्यांसमोर काही आव्हानं आहेत. चित्त्यांना भारतातील वातावरणाशी जुळवून घ्यावं लागेल. चित्ता दोन तीव्र स्वरूपाच्या वातावरणाची लवकर जुळवून घेतो असे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे

या चित्त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येईल. त्यांना 12 किलोमीटरच्या विशेष अधिवासात विलगीकरणात म्हणजेच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल. चित्त्यांना येथील प्राण्यांची शिकार करावी लागेल. भारतात आढळणारं हरीण आफ्रिकेत आढळतं नाही. त्यामुळे या प्राण्याची शिकार करणं चित्त्यांना जमेल का?, हा प्रश्न आहे. निरीक्षणानंतर चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात येईल.

नामिबियातून भारतात आणण्यापूर्वी या सर्व चित्त्यांच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या यशस्वी झाले आहेत त्यांचे रोगप्रतिकारक लसीकरणही झाले आहे.

चित्त्यांच्या देखरेखीसाठी चित्ता फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अधिकारी पुढील काही महिने कुनो राष्ट्रीय अभयारण्यत वास्तव्य करणार आहेत. त्याचबरोबर अन्य प्राणी तज्ञांच्या फेऱ्या देखील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात वाढणार आहेत मध्य प्रदेश सरकारचे वन आणि पर्यावरण मंत्रालय तसेच केंद्र सरकारचे वन आणि पर्यावरण मंत्रालय यामध्ये विशेष सहभाग देखील घेत आहे.

चित्ता ही प्रजाती भारतात यापूर्वी होतीच. मानवी हस्तक्षेप, अतिशिकार यामुळे ती नष्ट झाली असली तरी नवतंत्रज्ञान वापरून चित्ते प्रजाती नैसर्गिक स्वरूपात पुन्हा वाढविण्याचे आव्हान भारत सरकारने स्वीकारले आहे. भारतात ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आहे. असेच चित्ते अभियान देखील यशस्वी होईल, असा आशावाद या निमित्ताने व्यक्त झाला आहे.

Cheetahs in India after 70 years Got domicile on Modi’s 72nd birthday

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात