वृत्तसंस्था
भोपाळ : भारतीय वन्यजीव संस्थेने काही वर्षांपूर्वी चित्त्याचा पुनरुज्जीवन प्रकल्प तयार केला होता. त्याला आता मूर्त स्वरूप येणार आहे. वर्षा अखेर चित्ता आफ्रिकेतून भारतात आणण्यात येणार आहे. Cheetah Is Planned To Be Brought To India From Africa By The End Of This Year
जगातील सर्वात वेगवान प्राणी अशी चित्त्याची ओळख आहे. १९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष जाहीर करण्यात आला होता.
आता चित्ता याच वर्षअखेपर्यंत आफ्रिकेतून भारतात आणण्यात येणार आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ता आणला जाईल, अशी माहिती राज्याचे वनमंत्री विजय शहा यांनी रविवारी दिली.
भारतीय वन्यजीव संस्थेने (डब्ल्यूआयआय) काही वर्षांपूर्वी चित्त्याचा पुनरुज्जीवन प्रकल्प तयार केला होता. आफ्रिकेतील चित्त्यांना प्रायोगिक तत्त्वावर भारतातील अनुरूप अधिवासात परत आणण्यास सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मान्यता दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App