Chandrayaan-3 Mission : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार ‘या’ दिवशी होणार ‘चांद्रयान-३’चे सॉफ्ट लँडिंग!

यानाचं दुसरं आणि निर्णायक, डी-बूस्टिंग यशस्वीरित्या पूर्ण

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  भारताच्या चांद्रयान-३ चं २३ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी होणार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग होणार आहे. आज यानाचं दुसरं आणि निर्णायक, डी-बूस्टिंग यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. चांद्रयान-३ मिशनचे लँडर मॉड्यूल (विक्रम लँडर) रविवारी (२० ऑगस्ट) चंद्राच्या जवळ पोहोचले आहे.  Chandrayaan 3 is set to land on the moon on August 23

चांद्रयान 3 च्या लँडिंगमध्ये काही अडचण आली तर महिनाभरानंतर पुन्हा प्रयत्न केला जाईल. चांद्रयान-३ साठी दुसऱ्या दिवशी सकाळची वाट पाहावी लागणार आहे  आणि ही सकाळ 28 दिवसांनी होईल. मात्र, यावेळी यशस्वी लँडिंगसाठी पूर्ण आशा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

ISRO ने ट्विट केले की, “चांद्रयान-3  23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6:04 वाजता चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज आहे. तुमच्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार.” चांद्रयान-3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाल्यानंतर, लँडर आता स्वतःहून पुढे जात आहे आणि चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर प्रदक्षिणा घालत आहे.

Chandrayaan 3 is set to land on the moon on August 23

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात