केंद्रात मंत्री झाल्यावर नारायण राणेंचे महाराष्ट्रातले नेते, कार्यकर्ते, मित्र, हितचिंतकांना उद्देश्यून भावनिक पत्र; ते काय म्हणालेत त्यात…??

प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस किंवा शरद पवारांनी नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांचा १२ वर्षांचा राजकीय विजनवास संपविला. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली. यावरून नारायण राणे यांच्या भावना उचंबळून आल्या असून त्यांनी महाराष्ट्रातले नेते, कार्यकर्ते, मित्र आणि हितचिंतकांना उद्देश्यून एक भावनिक पत्र लिहिले आहे.Central MSME minister Narayan Rane writes emotional letter to maharashtra leaders, workers, well wishers and friends

तुमच्या सदोदित प्रोत्साहनामुळे मी येथवर येऊन पोहोचलो. तुम्ही दिलेले प्रेम आणि सहकार्य याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेन काय, असे भावपूर्ण उद्गार नारायण राणे यांनी पत्रात काढले आहेत.या पत्रात नारायण राणे यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.या पत्रात ते म्हणतात…

केंद्रात मंत्री झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून, प्रत्येक जिल्ह्यातून, सर्व पक्षांचे पदाधिकारी, नेते तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनी मला फोन करून आणि अन्य मार्गाने माझे अभिनंदन केले आणि मला शुभेच्छा दिल्या.

काही जणांनी देवाजवळ प्रार्थनाही केल्या. आपल्या या प्रेमाबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. तुमच्या प्रोत्साहनामुळेच मी येथवर पोहचू शकलो. भविष्यातही आपल्याकडून असेच प्रेम, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळत राहो, ही नम्र अपेक्षा. आपल्या माझ्यावरच्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे.

महाराष्ट्रातील सर्व नेते, हितचिंतक, मित्र व कार्यकर्ते या साऱ्यांनी दिलेले प्रेम व सहकार्य याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल का?, असा प्रश्न माझ्या मनात दाटला आहे, अशा भावना त्यांनी पत्राच्या अखेरीस व्यक्त केल्या आहेत.

Central MSME minister Narayan Rane writes emotional letter to maharashtra leaders, workers, well wishers and friends

महत्त्वाच्या बातम्या