विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय पोषण अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विष्णुपुर येथे काढलेल्या सायकल रॅलीत सहभाग घेतला. या रॅलीतून सरकारच्या या योजनेचा प्रसार अधिकाधिक व्हावा, यासाठी त्यांनी स्वतः सायकल चालवून जनजागृती केली. त्या आंनदाने अन्य महिलांबरोबर सायकल चालवित असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.central minister Smriti Irani Riding bicycles at rallies; Rally for National Nutrition Campaign At vishnupur
पोषण अभियान मार्च २०१८ मध्ये पंतप्रधानांनी भारत सरकारच्या प्रमुख कार्यक्रमाच्या रूपात सुरू केली आहे. कुपोषित बालकांना, गर्भवतींना आणि स्तनपान करणा -या मातांना पोषक आहार मिळावा, हा योजनेचा उद्देश आहे. आज २०२१ मध्ये भारत केवळ कोरोनाच्या प्रादुर्भावाबरोबरच देशातील कुपोषणाशीही लढत आहे.
२०२१ च्या अर्थसंकल्पात पौष्टिकतेचा अजेंडा मिशन मोडमध्ये घेण्याच्या आधीच सुरू केलेल्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी एक रोड मॅप दिला आहे.मिशन पोषण २.० एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) – अंगणवाडी सेवा, पूरक पोषण कार्यक्रम, पोषण अभियान, किशोरवयीन मुलींसाठी योजना आणि राष्ट्रीय क्रेच योजना एकत्र आणते.
देशात आरोग्य, निरोगीपणा आणि रोग आणि कुपोषणापासून संरक्षण देणाऱ्या पद्धती विकसित करण्यावर नव्याने लक्ष केंद्रित करून पोषण सामग्री, वितरण, पोहोच आणि परिणाम मजबूत करण्यासाठी एक व्यापक, एकसंध धोरण राबवणे हा उद्देश आहे.
त्यासाठी दरवर्षी सप्टेंबर हा देशभरात राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. त्याअंतर्गत ही जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. महिला आणि बाल कल्याण मंत्री या नात्याने त्यांनी रॅलीत सायकल अन्य महिलांसमवेत चालवली.
Truly inspiring to see Hon'ble Union Cabinet Minister Smt. @smritiirani ji leading the Poshan Cycle Rally at Bishnupur as a part of #POSHANMaah2021 Campaign.@narendramodi @AmitShah @JPNadda @blsanthosh pic.twitter.com/Aj0ukfdTCb — N.Biren Singh (Modi Ka Parivar) (@NBirenSingh) September 12, 2021
Truly inspiring to see Hon'ble Union Cabinet Minister Smt. @smritiirani ji leading the Poshan Cycle Rally at Bishnupur as a part of #POSHANMaah2021 Campaign.@narendramodi @AmitShah @JPNadda @blsanthosh pic.twitter.com/Aj0ukfdTCb
— N.Biren Singh (Modi Ka Parivar) (@NBirenSingh) September 12, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App