वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएसईने २०२१ २२ या शैक्षणिक वर्षासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यात विद्यार्थ्यांवरील भार कमी करण्याच्या उद्देशाने या मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डांची परीक्षाही प्रत्येकी ५० टक्के अभ्यासक्रमासह दोन टप्प्यांत घेतली जाणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी करण्यात आली. CBSE exams to be held in two phases, 50% syllabus for 10th, 12th
अभ्यासक्रमाची विभागणी दोन भागांत केली जाणार आहे. प्रत्येक सत्राच्या अखेरीस त्या-त्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेण्यात येणार आहेत. शैक्षणिक सत्राच्या अखेरीस दहावी व बारावीची परीक्षा बोर्डाकडून घेण्याची शक्यता अधिक असावी, त्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे, असे ‘सीबीएसई’कडून स्पष्ट करण्यात आले.
कोरोनाच्या साथीमुळे शाळा व कॉलेजांचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. कोरोनामुळे दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षाही रद्द कराव्या लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, नवीन शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन योग्य मूल्यमापन करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे ‘सीबीएसई’ने म्हटले आहे.
अंतर्गत मूल्यमापनासाठी ‘सीबीएसई’ने सूचना दिल्या आहेत. इयत्ता नववी व दहावीसाठी सत्र एक व दोनमध्ये वर्षभर घटक चाचण्या, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रवण; तसेच भाषण उपक्रम / प्रकल्प यावरून अंतर्गत मूल्यमापन केले जावे, असे ‘सीबीएसई’ने म्हटले आहे. तर, अकरावी व बारावीच्या वर्गांसाठी घटक चाचण्या / उपक्रम/प्रात्यक्षित/प्रकल्प यांवरून अंतर्गत मूल्यमापन केले जावे, असे स्पष्ट केले आहे. पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर डिसेंबर २०२१मध्ये घेतली जाईल, तर दुसऱ्या सत्राची परीक्षा मार्च-एप्रिल २०२२मध्ये घेतली जाईल. मात्र त्या त्या वेळची परिस्थिती बघून या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App