अखेर चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्माविरोधात गुन्हा दाखल, राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंवर केले होते वादग्रस्त ट्विट


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एका वादग्रस्त ट्विटमुळे प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्मा यांच्यावर आयटी कायद्यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज सिंह यांनी हजरतगंज पोलिसांत हा गुन्हा दाखल केला आहे.Case filed against film director Ram Gopal Varma For Controversial tweet on presidential candidate Draupadi Murmu

नेत्यांनी केली होती तक्रार

राम गोपाल वर्मा यांनी द्रौपदी आणि पांडवांवर वादग्रस्त ट्विट केले होते. याबाबत भाजपमधून नाराजी व्यक्त होत होती. वादग्रस्त ट्विटमुळे राम गोपाल वर्मा कायदेशीर अडचणीत सापडले. भाजपच्या नेत्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती.



वर्मा यांनी काय म्हटले?

‘रंगीला’ आणि ‘सत्या’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या राम गोपल वर्मा यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यावर ट्विट केले. त्यांनी लिहिले, “जर द्रौपदी राष्ट्रपती असेल तर पांडव कोण आहेत? आणि महत्त्वाचे म्हणजे कौरव कोण आहेत?” त्यांच्या या ट्विटचा सोशल मीडिया वापरकर्त्यांनी निषेध केला आणि आक्षेपही घेतला.

प्रकरण पुढे गेल्यानंतर, भाजप नेते गुडूर रेड्डी आणि टी. नंदेश्वर गौर यांनी राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात हैदराबादमधील अबिड्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी वर्मा यांच्यावर ताशेरे ओढले होते, त्यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मुर्मू यांच्यावर अवमानकारक टिप्पणी केली आहे.

राम गोपाल यांचा निषेध

अबिडचे पोलिस निरीक्षक बी. प्रसाद राव यांनी वर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याबाबत बोलले होते. त्यांनी सांगितले होते, “आम्हाला तक्रार प्राप्त झाली आहे आणि ती कायदेशीर सल्ल्यासाठी पाठवण्यात आली आहे. कायदेशीर सल्ला मिळाल्यानंतर आम्ही वर्मा यांच्याविरोधात एससी/एसटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करू.”

त्याचवेळी आंध्र प्रदेश भाजपचे प्रमुख सोमू वीरराजू यांनी राम गोपाल वर्मा यांच्या ट्विटवर जोरदार टीका करत कठोर कारवाईची मागणी केली होती. राम गोपाल वर्मा यांना तुरुंगात पाठवावे, असेही ते म्हणाले. तसेच, मानसोपचार तज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करावी. वाद सुरू झाल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, त्यांचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने घेण्यात आला आहे.

Case filed against film director Ram Gopal Varma For Controversial tweet on presidential candidate Draupadi Murmu

महत्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात