कॅ. अमरिंदर सिंग यांच्यासोबत पत्नी आणि मुलगाही नाही, आमदारकी सोडण्यास नाही तयार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मुख्यमंत्रीपद गेल्याने पक्ष सोडण्याची धमकी देणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यापासून दूर राहण्याचे काँग्रेसच्या ७७पैकी बहुसंख्य आमदारांनी ठरविले असल्याचे दिसत आहे. ते पक्ष सोडण्यास तयार नाहीत. इतकेच काय, पण कॅप्टनच्या पत्नी व पतियाळाच्या काँग्रेस खासदार प्रणित कौर आणि मुलगा रानिंदर सिंग हेही काँग्रेसमधून बाहेर पडायला तयार नाहीत. Ca. Amarinder Singh has no wife or son and is not ready to leave the legislature

काँग्रेसमधून बाहेर पडण्याची घोषणा करणाºया कॅप्टननी आपल्यासोबत काँग्रेसचे बरेच आमदार आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बुधवारी सांगितले. पण ते गुरुवारी चंदीगडला परतले, तेव्हा त्यांच्या स्वागताला हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच आमदार होते.



कॅप्टन पंजाब विकास पार्टी स्थापन करतील, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. पण आपण कॅप्टनबरोबर गेल्यास फेब्रुवारीतील विधानसभा निवडणुकीत आपण पराभूत होऊ, अशी भीती काँग्रेस आमदारांना वाटत आहे. त्यामुळे ते बाहेर पडायला तयार नाहीत.

कॅप्टन बाहेर पडण्याची घोषणा करीत असले तरी त्यांच्यामागे आमदार नाहीत, हे सर्वांना लक्षात आले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी भाजप व अकाली दल हेही करायला तयार नाहीत.

Ca. Amarinder Singh has no wife or son and is not ready to leave the legislature

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात