Burning Bengal : ममतांचा शपथविधी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांची राष्ट्रपती राजवटीची चेतावनी


  • राज्यपालांच्या संबोधनानंतर पुन्हा नवीन मुख्यमंत्री कधी बोलत नाहीत. परंतू ममता यांनी धनखड यांना लगेचच उत्तर दिले.तेंव्हा वातावरण तापले होते .

  • यानंतर राज्यपाल जगदीप धनखड यांचे एक ट्विट केले.ह्या ट्विट मधून त्यांनी ममतांना राज्यात राष्ट्रपति राजवट लागू करण्याचा इशारा दिला आहे. 

विशेष प्रतिनिधी

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारा दरम्यान तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात निकालानंतर राज्यात उफाळलेल्या हिंसाचारावर राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना चांगलेच सुनावले.Burning Bengal: Mamata’s swearing in ceremony and Governor Jagdeep Dhankhad’s warning of the President Rule

 

ममता यांनी सरकार बनविल्यानंतर आपली पहिली प्राथमिकता ही कोरोना राहणार असल्याचे सांगितले.यावर शेजारीच उभे असलेल्या राज्यपाल जगदीप धनखड यांनी राज्यात हिंसाचार सुरु आहे यावरून चिंता व्यक्त केली. यावर ममता यांनी राज्यपालांना लगेचच उत्तर दिले त्यामूळे वातावरण तणावाचे बनले होते.

ममता बॅनर्जी यांनी मीडियाला संबोधित करताना म्हटले की, आपली प्राथमिकता कोरोना संकटावर नियंत्रण मिळविणे ही राहील.राज्यात सर्व राजकीय पक्षांनी शांतता राखावी, असे आवाहन केले. पश्चिम बंगालला अशांती आवडत नाही.

यानंतर शेजारी उभे असलेल्या राज्यपालांनी ममतांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्याबाबत अभिनंदन केले. अपेक्षा करतो की सरकार कायदा आणि संविधानानुसार चालेल. भारत एक सुंदर लोकशाहीचा देश आहे, येथील सरकारे कायद्यानुसार चालतात. निवडणुकीनंतर सुरु झालेला हिंसाचार लोकशाहीसाठी धोक्याचा आहे, याबाबत मी मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे. लोक बंगालवरून चिंतेत आहेत, असे धनखड यांनी सांगितले.

मुख्यमंत्री लगेचच राज्यात कायद्याचे राज्य लागू करतील अशी अपेक्षा करतो. महिला आणि मुलांना जे नुकसान झाले आहे त्यांची मदत केली जाईल. देशाच्या संविधानाचा मुख्यमंत्री सन्मान करतील आणि राज्यासाठी काम करतील. मुख्यमंत्री, माझी छोटी बहीण यावर कारवाई करेल, तुम्ही नव्या प्रकारे शासन कराल, असेही धनखड म्हणाले.

राज्यपालांच्या बोलण्यानंतर पुन्हा नवीन मुख्यमंत्री कधी बोलत नाहीत. परंतू ममता यांनी धनखड यांना लगेचच उत्तर दिले.

माईक हातात घेऊन ममतांनी मी आज शपथ घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्य निवडणूक आयोगाकडे आहे. आयोगाने या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, नियुक्त्या केल्या ज्यांनी काहीच काम केले नाही. अशा परिस्थितीत मी जबाबदारी स्वीकारत आहे आणि लोकांना शांती स्थापन करण्याचे आवाहन करत आहे.

https://twitter.com/jdhankhar1/status/1389777560024731648?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1389777560024731648%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-8700328901961134962.ampproject.net%2F2104170104001%2Fframe.htmll

एकीकडे राज्यपालांनी दीदी यांना तिसर्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली आणि त्यानंतर लगेच त्यांनी एक ट्विट केले. राज्यपाल जगदीप धनखड म्हणाले की, ‘ममता बॅनर्जी, कोलकाता पोलिस आणि पश्चिम बंगाल पोलिसांकडे हा मुद्दा उपस्थित करूनही निवडणुकांनंतर राज्यातील हिंसाचार थांबलेला नाही. अशी हिंसा ही लोकशाहीसाठी लज्जास्पद आहे. अशा प्रकारे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या अवस्थेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. राज्यात अशी परिस्थिती चालूच शकत नाही.

Burning Bengal: Mamata’s swearing in Ceremony Governor Jagdeep Dhankhad’s warning of the President Rule

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात