विशेष प्रतिनिधी
लंडन : स्थलांतरीतांचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्रिटनमध्येही अमेरिकेप्रमाणेच डिजीटल व्हिसाची पद्धत अंमलात आणली जाणार आहे. यानुसार, ब्रिटनच्या सर्व सीमांवर डिजीटल यंत्रणा राबवली जाणार आहे. यामुळे स्थलांतरीतांबरोबरच, मालवाहतूक आणि पर्यटकांवर देखरेख ठेवता येणार असल्याचे माध्यमांनी सांगितले. Briton will implement digital visa system
ब्रिटनमध्ये विना व्हीसा येऊ इच्छिणाऱ्या लोकांना इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन यंत्रणेच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. याद्वारे दरवर्षी साधारण ३ कोटी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. या यंत्रणेद्वारे तस्करांवरही वचक ठेवता येणार असल्याचे येथील माध्यमांनी सांगितले. ब्रिटनच्या सर्व सीमा २०२५ पर्यंत डिजीटल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी याबाबतच्या आराखड्याला मंजुरी दिली असल्याचे येथील माध्यमांनी सांगितले. जगात आता विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला जात आहे. त्याला कोणतच क्षेत्र मर्यादित नाही. त्यात आता व्हिसाही डिजीटल झाल्यास अनेक बाबी सप्या होण्यास मदत होणार आहेत. डिजीटायजेशनमुळे मावी हस्तक्षेप कमी होतो आणि भ्रष्टाचारास मोठा आळा बसतो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App