ब्रिटनमध्ये नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास, निर्बंध शिथील करण्यास सुरुवात

वृत्तसंस्था

लंडन : कोरोना संसर्गवाढीमुळे वर्षाच्या सुरुवातीपासूनच पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे गेलेल्या ब्रिटनमध्ये निर्बंध शिथील होण्यास सुरुवात झाली आहे. आता नागरिक एकमेकांना इतर ठिकाणी भेटू शकणार असून अनेक क्रीडाप्रकारांनाही परवानगी देण्यात आली आहे. Briton lifts restrictions, all activities now open

ब्रिटनमध्ये जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून ‘स्टे ॲट होम’चे आदेश लागू होते. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना भेटण्यास परवानगी नव्हती. या काळात संसर्गाचे प्रमाण वेगाने खाली आले. त्यामुळे आता दोन कुटुंबांना किंवा सहा जणांना उद्याने किंवा इतरत्र भेटण्यास परवानगी देण्यात आली आहे.निवडक क्रीडा प्रकारांनाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून घरातच अडकून पडलेले अनेक नागरिक बाहेर फिरण्याचा आनंद घेत आहेत. टेनिस कोर्ट, जलतरण तलावांना नागरिकांनी पसंती दिली. प्रवास निर्बंधही हटविल्याने अनेक जणांना समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली होती.

ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत सव्वा लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून युरोपमधील ही सर्वोच्च संख्या आहे. लॉकडाऊनच्या काळात नव्या रुग्णांची संख्या वेगाने घटली.

Briton lifts restrictions, all activities now open

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*