ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे ब्रिटनमध्ये हाहाकार, सर्व रुग्णालये भरण्याचा दिला इशारा

वृत्तसंस्था

लंडन : ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे जगातील पहिला मृत्यू ब्रिटनमध्ये झाल्यानंतर या देशावर संसर्गवाढीने भीतीचे सावट निर्माण झाले आहे. हा संसर्ग इतक्या वेगाने पसरत आहे की लवकरच ब्रिटनमधील सर्व रुग्णालये भरुन जातील, असा इशारा देशाचे आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी दिला आहे.
संसर्गवाढीनंतर ब्रिटनमध्ये लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी हालचाली सुरु आहेत. या महिनाअखेरीपर्यंत सर्व प्रौढांना बूस्टर डोस देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. Briton facing challenges due to corona spredd


ब्रिटनमध्ये ओमीक्रोनची लाट ; एकाच दिवसात ७८ हजार रुग्णांना बाधा; आरोग्य यंत्रणा हादरली


या पार्श्वभूमीवर संसदेत बोलताना आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी, ओमिक्रॉनचा संसर्ग अत्यंत वेगाने वाढत असल्याचे सांगितले. ‘हा विषाणू तो इतक्या वेगाने पसरत आहे की ब्रिटनची सर्व रुग्णालये भरून टाकण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे आता विषाणू विरुद्ध लसीकरण अशी नवीन शर्यत सुरु झाली आहे,’ असे जाविद यांनी संसद सदस्यांना सांगितले. जानेवारीच्या मध्यापर्यंत ओमिक्रॉन युरोपमध्ये सर्वत्र पसरण्याची शक्यता आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असून युरोपमधील ६६.६६ टक्के जनतेचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

Briton facing challenges due to corona spredd

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात