वृत्तसंस्था
वलसाड : पेट्रोल – डिझेलच्या महागाईला नेमके जबाबदार कोण?? केंद्र सरकार की राज्य सरकार?? हा वाद महाराष्ट्रात सुरु असताना आणि त्यावरून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप सुरू असताना काही विशिष्ट आकडेवारीच समोर आली आहे. ही आकडेवारी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला आरसा दाखवत आहे. Brings petrol from neighboring Gujarat; It saves 3000 rupees per month
महाराष्ट्र – गुजरातच्या सीमेवरील गावांमधून अनेक ग्राहक गुजरातमध्ये जाऊन पेट्रोल – डिझेलची खरेदी करतात. पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे 14.00 रुपयांचा तर डिझेलच्या दरात लिटरमागे 3 50 रुपयांचा फरक पडतो. त्यामुळे महिन्याला 3000 रुपये वाचतात, अशी माहिती महाराष्ट्रातून गुजरात मध्ये जाऊन खरेदी पेट्रोल खरेदी करणाऱ्या एका तरुण ग्राहकाने एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
"I cross the Gujarat-Maharashtra border every day for my work and I usually purchase fuel from this pump. This way we save almost Rs14/liter in petrol and around Rs 3000 every month is saved," said a customer from Maharashtra pic.twitter.com/mdaFMcLA9D — ANI (@ANI) May 24, 2022
"I cross the Gujarat-Maharashtra border every day for my work and I usually purchase fuel from this pump. This way we save almost Rs14/liter in petrol and around Rs 3000 every month is saved," said a customer from Maharashtra pic.twitter.com/mdaFMcLA9D
— ANI (@ANI) May 24, 2022
वलसाड मधल्या पेट्रोल पंपावरून महाराष्ट्रात महाराष्ट्रातून येऊन पेट्रोल – डिझेल खरेदी करणा-यांची संख्या वाढली आहे. असेच चित्र महाराष्ट्राच्या अन्य सीमावर्ती राज्यांमध्ये देखील दिसते. तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकात जाऊन पेट्रोल डिझेल खरेदी करण्याकडे देखील महाराष्ट्रातल्या ग्राहकांचा कल आहे. कारण तेथे देखील पेट्रोल आणि डिझेल या दरांमध्ये सुमारे 10.00 रुपयांचा फरक आढळतो आणि नेमक्या त्याच हिशेबाने ग्राहकांचे दरमहा 2000 ते 2500 रुपये वाचताना दिसतात.
केंद्र सरकारचा इंधनावरचा कर 19.00 रुपये आहे, तर महाराष्ट्रात 30.00 रुपये कर आहे. सर्वसाधारणपणे केंद्र सरकारच्या करांपेक्षा राज्य सरकारचा कर 1.00 रुपयांनी जास्त असतो. परंतु महाराष्ट्र मध्ये ही तफावत तब्बल 11.00 रुपयांनी जास्त आहे. याचा परिणाम म्हणूनच महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामधले ग्राहक गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये जाऊन पेट्रोल-डिझेलची खरेदी करताना दिसतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App