karnataka election : कर्नाटकसाठी भाजपाचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार; जेपी नड्डांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार!

Karnataka elections

भाजपाने जाहीरनाम्यासाठी २२४ विधानसभा मतदारसंघांवर जनतेकडून सूचना मागवल्या होत्या.

विशेष प्रतिनिधी

बंगळुरु : कर्नाटक निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अशा स्थितीत भाजपा मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, कर्नाटकसाठी भाजपाचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, बीएस येडियुरप्पा हे जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. भाजपाचा जाहीरनामा उद्या सकाळी ११ वाजता बंगळुरूमध्ये प्रसिद्ध होणार आहे. BJPs manifesto for Karnataka will be released tomorrow

भाजपाने जाहीरनाम्यासाठी २२४ विधानसभा मतदारसंघांवर जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. ज्या वेबसाइट, व्हॉट्सअॅप आणि क्यूआर कोडच्या माध्यमातून मागवण्यात आल्या होत्या. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी आणि पक्षाच्या रॅलीत डबे ठेवण्यात आले होते. ज्यामध्ये जनता जाहीरनाम्यासाठी सूचना टाकू शकत होती.  मोफत वीज, गृहिणींना रोख रक्कम, मोफत दहा किलो तांदूळ अशा हमी काँग्रेसने दिल्या आहेत. तेव्हापासून भाजपावर अशाच लोकभावनापूर्ण घोषणा करण्याचा दबाव आहे.

भाजपाच्यावतीने याला व्हिजन डॉक्युमेंट म्हटले जाईल. त्याची थीम असेल “प्रजा ध्वनी” म्हणजेच लोकांचा आवाज. ज्यामध्ये बोम्मई सरकारच्या टक्के मुस्लीम आरक्षण रद्द करून, दोन टक्के लिंगायत आणि वोक्कलिंगामध्ये विभाजित करण्याच्या निर्णयाचाही उल्लेख केला जाईल. गरज पडल्यास विधानसभेच्या माध्यमातून त्याला कायदेशीर स्वरूप देण्यात येईल, असे भाजपाने व्हिजन डॉक्युमेंटमध्ये म्हटले आहे.

BJPs manifesto for Karnataka will be released tomorrow

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात