विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: गोव्यामध्ये आम आदमी पक्ष आणि तृणमूल कॉँग्रेसने हवा करण्याचा प्रयत्न केला असला तरी भारतीय जनता पक्षच आगामी विधानसभा निवडणुकीत बाजी मारणार असल्याचे एबीपी आणि सी व्होटरच्या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.BJP will win in Goa, Manipur, Aap preference over Congress in Goa
गोव्यात विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. सर्व्हेत सहभागी असलेल्या नागरिकांनी सर्वाधिक ३६ टक्के पसंती भाजपला दिली आहे. काँग्रेसला १९ टक्के, आम आदमी पाटीर्ला २४ टक्के आणि इतर पक्षांना २१ टक्के मतं नोंदवली आहेत.
गोव्याच्या आगामी निवडणुकीत भाजपला एकूण ४० जागांपैकी १९ ते २३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर काँग्रेसला २ ते ६, आपला ३ ते ७ आणि इतर पक्षांना ८ ते १२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गोव्यातील ३० टक्के नागरिकांनी विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. गोव्यात सरकार आले तर मुख्यमंत्री भंडारी समाजाचे आणि उपमुख्यमंत्री ख्रिश्चन धमार्चे असतील, असं मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे.
या पार्श्वभूमीवर १९ टक्के नागरिक आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रताप सिंह राणे यांचे पुत्र आणि भाजप नेते विश्वजीत राणे यांना १५ टक्के नागरिकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी आहे. याठिकाणी तृणमूल कॉँग्रेसने निवडणूक लढविण्याची घोषणा केली असली तरी त्यांना विशेष प्रतिसाद मिळत नसल्याचेही सर्व्हेतून दिसून आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App