विशेष प्रतिनिधी
कोलकता – प.बंगालचे नूतन भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी राज्याच्या तालिबानीकरणाविरुद्ध लढू, असा निर्धार व्यक्त केला. भाजपने दिलीप घोष यांच्याऐवजी प.बंगालमधील बालूरघाटचे खासदार सुकांता मजुमदार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सोपविली आहेत. घोष यांची पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.BJP will fight against talibnisation in west Bengal
गेल्या काही दिवसांत भाजपमधून होणाऱ्या पक्षांतराला फारसे महत्त्व देण्यास नकार देत ते म्हणाले, की पक्षाच्या विचारधारेला एकनिष्ठ असणारे कधीही पक्ष सोडून जाऊ शकत नाहीत. पक्षश्रेष्ठींच्या सहकार्याने मी प.बंगालच्या तालिबानीकरणाविरुद्ध लढाई सुरूच ठेवेन.
आमच्यासाठी भाजप कार्यकर्तेच खरी संपत्ती आहेत. आम्ही जर काही चुका केल्या असतील तर त्या दुरुस्त करू.ज्यांना असे वाटते की, आपण भाजपमधून बाहेर पडून पक्षाचे नुकसान करू शकतो, ते चुकीचे आहेत. येत्या काळात भाजप विजयी होईल. पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ असणारे कधीही पक्ष सोडू शकत नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App