अनुसूचित जातीबद्दलची वक्तव्ये तृणमूल कॉंग्रेसला पडणार चांगलीच महागात, भाजप करणार आंदोलन

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली – भाजपचे सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम, सुनीता दुग्गल, हंसराज हंस आणि पक्षाच्या अनुसूचित जातीच्या विभागाचे प्रमुख लालसिंग आर्य या भाजपच्या दलित खासदारांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला निवेदन दिले आहे. BJP will demonstrate against TMC

तृणमूल’च्या नेत्या सुजाता मोंडल खान यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्याने अनुसूचित जातीबद्दल तिरस्कारपूर्ण वक्तव्ये केल्याच्या निषेधार्थ भाजप पश्चिचम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणत आंदोलन करणार आहे. तृणमूल काँग्रेस दलित विरोधी असून भाजप बंगालमध्ये सत्ताधारी पक्षाविरोधात आंदोलन करेल, असे गौतम यांनी सांगितले.

BJP will demonstrate against TMC


महत्वाच्या बातम्या वाचा…