GAUTAM GAMBHIR : भाजप खासदार गौतम गंभीर यांना’ISIS Kashmir’कडून जीवे मारण्याच्या धमक्या

गौतम गंभीरला 24 तासात दुसऱ्यांदा धमकी; दिल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल-सुरक्षा वाढवली  BJP MP Gautam Gambhir receives death threats from ‘ISIS Kashmir’


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे की त्यांना ‘इसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. दिल्ली पोलिस गौतम गंभीरच्या तक्रारीची चौकशी करत आहेत. या धमक्या त्यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आल्या होत्या.

भाजपचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना 24 तासात दुसऱ्यांदा ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 24 तासात ईमेलद्वारे दुसऱ्यांदा धमकी देण्यात आल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गंभीर यांन बुधवारी दुपारी ईमेलद्वारे धमकी देण्यात आली. त्याआधी त्यांनी मंगळवारी रात्री ईमेलद्वारे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.24 तासात त्यांना दुसऱ्यांदा धमकी देण्यात आल्याने त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इसिस कश्मीरकडून त्यांना ठार मारण्याची धमकी आल्याचे त्यांनी सांगितले आहे. गंभीर यांनी याबाबत दिल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गंभीर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपसाला सुरुवात केली आहे. तसेच सतर्कता बाळगत गंभीर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

गौतम गंभीर यांच्या घराजवळही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मंगळवारी रात्री धमकी आल्यानंतरही गंभीर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

 BJP MP Gautam Gambhir receives death threats from ‘ISIS Kashmir’

महत्त्वाच्या बातम्या