विशेष प्रतिनिधी
बलिया – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार देशात जातीय जनगणनेची मागणी लावून धरत आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजपचे उत्तर प्रदेशचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. नितीशकुमार यांना खरोखरच गरिबांना न्याय द्यायचा असेल, तर त्यांच्यासह उपेक्षित समुदायातील श्रीमंत व्यक्तींनी आरक्षणाचे फायदे सोडून द्यायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली. BJP mla targets CM nitish kumar
ते म्हणाले, की बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार नेहमीच सामाजिक न्यायाबद्दल बोलतात. आपल्या समाजातील मागास बंधूभगिनींना खरोखरच न्याय मिळवून देण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासह श्रीमंत व्यक्तींनी आरक्षणाचा हक्क सोडून द्यावा. त्यांनी असे केल्यास मागासवर्गीयांना आरक्षणाचा लाभ घेता येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने जातीय जनगणनेच्या मागणीसाठी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. विविध जातींच्या आकडेवारीमुळे विकासाच्या योजना योजना प्रभावीपणे राबविता येतील, यावरही नितीशकुमार यांनी या भेटीत भर दिला होता. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्विनी यादव यांचाही या शिष्टमंडळात समावेश होता. त्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी नितीशकुमार यांना हा सल्ला दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App