म्हणे, मोदींपेक्षा ममता लोकप्रिय!!; 2024 पर्यंत थांबा NOTA पेक्षा कमी मते मिळतील; सुवेंदू अधिकारींचे प्रत्युत्तर

BJP Leader Suvendu Adhikari Strong Reply To Abhishek Banerjee, Says TMC Will Receive Less Than NOTA, Wait Till 2024

BJP Leader Suvendu Adhikari : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा लोकप्रिय आहेत आणि तसेही सध्या देशात सगळे काही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ठरवत आहेत, असा अजब दावा करणाऱ्या खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. BJP Leader Suvendu Adhikari Strong Reply To Abhishek Banerjee, Says TMC Will Receive Less Than NOTA, Wait Till 2024


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा लोकप्रिय आहेत आणि तसेही सध्या देशात सगळे काही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ठरवत आहेत, असा अजब दावा करणाऱ्या खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

इतकी घाई काय करता? 2024 पर्यंत थांबा तृणमूल काँग्रेसला इतर राज्यांमध्ये NOTA पेक्षा कमी मते मिळालेली दिसतील, असा टोला सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना लगावला.

पश्चिम बंगाल जिंकले आता आसाम, त्रिपुरा, गोवा आणि अन्य राज्यांमध्ये सुद्धा आम्ही जाऊन भाजपचा पराभव करू, असा दावा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी भवानीपूरमध्ये विविध प्रचार सभांमध्ये केला आहे. त्याचवेळी त्यांनी ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा लोकप्रिय आहेत. त्यामुळे भाजपचे नेते त्यांच्यावर जळतात त्यांना परदेश दौरे करण्यापासून रोखतात, असा दावा केला आहे.

या दाव्यालाच सुवेंदू अधिकारी यांनी प्रत्युत्तर दिले आहे ते म्हणाले इतकी घाई कशाला करायची? सर्व विरोधी पक्षांचा एक चेहरा म्हणून ममता बॅनर्जी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा पुढे केल्यावर नेमके काय होणार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पश्चिम बंगाल सोडून बाकीच्या राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेसचे काहीही अस्तित्व नाही. तेथे त्यांना NOTA पेक्षा कमी मते मिळालेली 2024 च्या निवडणुकीत दिसतील आणि मग त्यांना कळेल लोकप्रिय कोण आहे? मोदी की ममता!!, अशा शब्दांमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी टोला हाणला आहे. देशाच्या राजकारणात सध्या मोदींच्या तोडीचा कोणीही नेता लोकप्रिय नाही असेही ते म्हणाले.

BJP Leader Suvendu Adhikari Strong Reply To Abhishek Banerjee, Says TMC Will Receive Less Than NOTA, Wait Till 2024

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण