नवख्या आम आदमी पक्षाच्या धोरणांची भाजप, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांनाही पडू लागली भुरळ, मनीष सिसोदिया यांचा दावा


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : केंद्रातील सत्तारुढ भाजप तसेच कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना आम आदमीसारख्या नवख्या पक्षाच्या धोरणांची भूरळ पडू लागली आहे असा दावा दिल्ली सरकारने केला आहे.BJP, Congress targets by AAP

मते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘गव्हर्नन्स मॉडेल’चे अनुकरण भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस करीत आहे. त्या आधारेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये ते मोफत वीज आणि महिलांना मोफत प्रवास या सुविधा देण्याचे आश्वातसन देत आहेत.



 

ते म्हणाले, ‘‘कोरोनाची रुग्ण संख्या मर्यादेत ठेवण्यासाठी लक्षणे नसलेल्या रुग्णांचे गृह विलगीकरण करण्याचा मुद्दा सर्वांत प्रथम केजरीवाल यांनी मांडला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गृह विलगीकरणावर भर देण्याची सूचना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना देत आहेत.’’

केजरीवाल यांचे मॉडेल हेच विकासाचे योग्य मॉडेल असल्याचे आता केंद्र सरकारला समजू लागले आहे. त्यामुळे आतातरी केंद्र केजरीवाल सरकारच्या विकास कामांमध्ये अडचणी निर्माण करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.

BJP, Congress targets by AAP

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात