भाजप लाखो गुंड घेऊन बंगाल बळकावयला येतोय, तुम्ही बंगालआधी आता दिल्लीचा विचार करा; ममतांचा मतदारांना “सोंदेश”

वृत्तसंस्था

कुचबिहार – बंगालमध्ये मतदानाचे तीन टप्पे संपल्यानंतर प्रचाराची धार आणि प्रहार वाढले असून भाजपच्या आक्रमक प्रचाराला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील व्हिलचेअरवर बसून तितकेच आक्रमक उत्तर देताना दिसत आहेत. BJP came with lakhs of goons from outside to capture Bengal. It is not so easy mamata banerjee

भाजपने केंद्रीय नेतृत्वापासून विविध राज्यांमधल्या कार्यकर्त्यांच्या फौजा बंगालमध्ये प्रचारात उतरविल्या आहेत. त्यावर ममतांनी आक्षेप घेत भाजप लाखो गुंड घेऊन बंगाल बळकावयला येतोय. तुम्ही बंगालआधी दिल्लीचा विचार करा, असा संदेश बंगाली मतदारांना दिला आहे. बंगाल जिंकून नंतर दिल्लीही जिंकण्याची जिद्द ममतांनी ठेवली आहे. एका पायावर बंगाल जिंकेन आणि नंतर दोन्ही पायांवर दिल्ली जिंकेन अशी गर्जना ममतांनी परवाच हावड्यातील सभेत केली होती. आज कुचबिहारच्या सभेत त्याच्या पुढची घोषणा त्यांनी मतदारांना दिल्लीवर लक्ष केंद्रीत करायला सांगून केली.ममतांनी मध्यंतरी आपल्या भाषणात सीआरपीएफ जवानांवर निशाणा साधला होता. आज त्यांनी ते वक्तव्य सावरून घेतले. त्या म्हणाल्या, सीआरपीएफ जवानांचा मी आदर करते. पण भाजपचे कार्यकर्ते सीआरपीए जवानांच्या वेशात येतात आणि महिलांना मतदानापासून रोखतात. लोकांना त्रास देतात, त्यांना मी कायमच विरोध करीत राहणार आहे. सीआरपीएफच्या जवानांनी मतदान केंद्रात येऊन मतदान प्रक्रिया रोखता कामा नये.

तृणमूळ काँग्रेसला मोकळ्या वातावरणात निवडणूक व्हावी असे वाटते. प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी तो बजावला पाहिजे, असेही ममतांनी सांगितले.

BJP came with lakhs of goons from outside to capture Bengal. It is not so easy mamata banerjee

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*