नवी दिल्ली : दिल्लीतील केजरीवाल यांच्या सरकारने ऑक्सिजनची मागणी फुगविल्याचा आरोप भाजपने केला असून करून याबद्दल राजीनामा द्यावा अशी मागणी कली आहे. BJP accuses Kajriwal government in Delhi of inflating oxygen demand
प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी केजरीवाल यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाच्या हलगर्जीपणाचा आरोप केला आणि त्यांच्या अटकेची मागणी केली. त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या अंतरिम अहवालानुसार केजरीवाल यांनी प्रत्यक्षातील मागणी चौपट फुगविली. परिणामी इतर राज्यांना तुटवडा जाणवला. त्यातून कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले. स्वतः केजरीवाल हेच यास जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे.
आपने यास यापूर्वीच प्रत्यूत्तर दिले आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपनेच या अहवालाचा बनाव रचला असून त्याच्या आधारावर दिल्ली सरकारला दोषी धरण्याचा प्रयत्न असल्याचा प्रतिदावा आपने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App