वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मोठी कारवाई करत ट्विटरने पाकिस्तान सरकारचे खाते भारतात ब्लॉक केले आहे. ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या नोटीसनुसार, कायदेशीर मागणीवरून पाकिस्तान सरकारचे खाते बंद करण्यात आले आहे.Big action by Twitter, Twitter account of Pakistan government is blocked in India
ट्विटरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, न्यायालयाचा आदेश किंवा सरकारी मागणी यासारख्या वैध कायदेशीर मागणीवर खाते ब्लॉक करावे लागते.
इतर देशांमध्ये अकाउंट सुरू
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांमध्ये सक्रिय आहे. याप्रकरणी भारत किंवा पाकिस्तानच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाऊंट उघडल्यावर तिथे लिहिले आहे की, “भारतातील एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून पाकिस्तान सरकारचे भारतातील ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.”
तिसऱ्यांदा कारवाई
एएनआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे ट्विटर अकाउंट भारतात पाहण्यावर बंदी घालण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी जुलै 2022 मध्ये पाकिस्तान सरकारच्या ट्विटर खात्यावर भारतात बंदी घालण्यात आली होती, परंतु नंतर ते पुन्हा दिसू लागले.
गेल्या वर्षी जूनमध्ये ट्विटर इंडियाने भारतातील संयुक्त राष्ट्र, तुर्की, इराण आणि इजिप्तमधील पाकिस्तानी दूतावासांची अधिकृत ट्विटर अकाउंट ब्लॉक केली होती. यासोबतच भारताने भारतविरोधी खोटी माहिती पसरवणाऱ्या अनेक यूट्यूब चॅनल आणि फेसबुक अकाउंटवर पाकिस्तानमधून बंदी घातली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App