विशेष प्रतिनिधी
गांधीनगर : गुजरातमध्ये नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी – गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आपले अख्खे कॅबिनेट बदलून टाकले आहे. जुन्यापैकी कोणत्याही नेत्याला आपल्या मंत्रिमंडळात संधी दिलेली नाही.Bhupendra Patel changes entire cabinet; But there is no “rocket science” in this, this is Modi’s old shock system !!
वरिष्ठ नेते म्हणून विधानसभेचे मावळते अध्यक्ष राजेंद्र द्विवेदी यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली आहे. बाकीचे सर्व नवे चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत. अर्थात, यात कोणतेही “रॉकेट सायन्स” नाही. कारण हे नरेंद्र मोदी यांचे जुने धक्कातंत्र आहे.
मोदींनी 2001 मध्ये केशुभाई पटेल यांच्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यावर सुरुवातीला जुन्या तंत्राने वागले. वर्षभरातच त्यांनी आपले स्वतःचे तंत्र विकसित करून गुजरात भाजपा मधल्या सर्व जुन्या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.
या नंतरच्या प्रत्येक पाच वर्षांनी मोदींनी आपल्या कॅबिनेटमध्ये अमुलाग्र बदल केल्याचे आढळते. आनंदीबेन पटेल, विजय रूपाणी नितीन पटेल ही मोदींनी संधी प्राप्त करून दिलेल्या नेत्यांची उदाहरणे आहेत. जुन्या नेत्यांना बाजूला सारून वर उल्लेख केलेल्या नेत्यांना मोदींनी संधी दिली आहे.
A total of 24 ministers have been sworn in the new cabinet, in the presence of Gujarat Chief Minister Bhupendra Patel and former CM Vijay Rupani. pic.twitter.com/LkzhOECTCg — ANI (@ANI) September 16, 2021
A total of 24 ministers have been sworn in the new cabinet, in the presence of Gujarat Chief Minister Bhupendra Patel and former CM Vijay Rupani. pic.twitter.com/LkzhOECTCg
— ANI (@ANI) September 16, 2021
मोदींच्या धक्का तंत्राचे आणखी उदाहरणच द्यायचे झाले तर 2007 मध्ये त्यांनी विद्यमान 62 आमदारांचे तिकीट कापले होते. त्यापैकी 42 जागा नव्या उमेदवारांमुळे भाजपच्या पदरात पुन्हा एकदा पडल्या होत्या. त्यामुळे आपोआपच मंत्रिमंडळात 70 टक्क्यांपेक्षा जास्त बदल झाला.
असाच प्रयोग त्यांनी 2012 मध्ये केला होता. पक्षसंघटनेत देखील त्यांनी याच प्रकारचे बदल घडवून आणले होते. त्यामुळे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी स्वतःचे मंत्रिमंडळ जरी बनविले असले तरी त्यावर छाप अन्य कुणाची नसून ती फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
नितीन पटेल यांची नाराजी, अन्य वरिष्ठ मंत्री यांची नाराजी याच्या दोन दिवस बातम्या चालल्यानंतर मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. त्यात मोदी यांनी आपले जुने धक्कातंत्र वापरत भूपेंद्र पटेल यांना संपूर्ण मंत्रिमंडळ बदलायला लावले आहे. आनंदीबेन पटेल, विजय रूपाणी, नितीन पटेल यापैकी एकाची ही नाराजी काम करू शकलेली दिसत नाही. मंत्रिमंडळाच्या शपथविधीला विजय रूपाणी उपस्थित होते.
यापैकी कोणीही आधीच्या मंत्रिमंडळात मंत्री नव्हते नऊ जणांना कॅबिनेट मंत्री पदाची आणि 15 जणांना राज्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App