वृत्तसंस्था
गांधीनंगर – नेहमीप्रमाणे प्रसार माध्यमांनी चालविलेल्या नावाला झुकांडी देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांच्या नावाला पसंती देत त्यांना मुख्यमंत्री बनविले आहे.Bhupendra Patel as the Chief Minister of Gujarat
गांधीनगरच्या कमलम या पार्टी ऑफीसमध्ये भाजप आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रसार माध्यमांनी मनसुख मांडविया, पुरूषोत्तम रूपाला, नितीन पटेल, गोवर्धन झपाडिया यांची नावे अबकी बार पाटीदार म्हणून चालविली होती. पण ती फोल ठरली. अखेर भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.
Gujarat: BJP MLA Bhupendra Patel elected as the new leader of BJP Legislative Party pic.twitter.com/nXeYqh7yvm — ANI (@ANI) September 12, 2021
Gujarat: BJP MLA Bhupendra Patel elected as the new leader of BJP Legislative Party pic.twitter.com/nXeYqh7yvm
— ANI (@ANI) September 12, 2021
भूपेंद्र पटेल हे आमदार आहेत. पक्षाचे केंद्रीय निरीक्षक केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत भूपेंद्र पटेल यांची निवड झाल्याची घोषणा केली..
नितीन पटेल, आर. सी. पाटील या दोन्ही नेत्यांनी काल आणि आज आपण मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यापैकी दोघांचीही निवड न होता भूपेंद्र पटेल हे नाव अचानकपणे पुढे आले. प्रसार माध्यमांनी जरी मनसुख मांडविया, पुरूषोत्तम रूपाला, नितीन पटेल, गोवर्धन झपाडिया यांची नावे अबकी बार पाटीदार म्हणून चालविली होती. पण ती फोल ठरली. अखेर भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे फारतर प्रसार माध्यमांचे अबकी बार पाटीदार एवढीच बातमी खरी ठरली असे म्हणावे लागेल. पण मुख्यमंत्रीपदाचे नाव मात्र त्यांनी चालविलेल्या नावांपेक्षा वेगळे निघाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App