
पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. मतदानासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या 200 मीटर आत CrPC चे कलम 144 लागू करण्यात आले आहे, जेणेकरून मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना टाळता येईल. सकाळी 7 वाजता मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. मतदानासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. प्रत्येक बूथवर केंद्रीय दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. Bhawanipur Bypoll Voting BJP Priyanka Tibrewal allegations on TMC Of Booth Capturing CM Mamata Banerjee
वृत्तसंस्था
भवानीपूर : पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. मतदानासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या 200 मीटर आत CrPC चे कलम 144 लागू करण्यात आले आहे, जेणेकरून मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना टाळता येईल. सकाळी 7 वाजता मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. मतदानासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. प्रत्येक बूथवर केंद्रीय दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांनी आज सकाळी प्रभाग क्रमांक 72 ला भेट दिली. त्या म्हणाल्या, “मदन मित्रा यांनी हे बूथ कॅप्चर करण्यासाठी मशीन बंद ठेवल्या आहेत जेणेकरून मतदार यावेत आणि निघून जावेत.”
Madan Mitra (TMC MLA) has purposely shut the voting machine here as he wants to capture the booth: Priyanka Tibrewal, BJP candidate for Bhabanipur by-poll at polling booth of ward number 72 pic.twitter.com/lFB5hQytTY
— ANI (@ANI) September 30, 2021
पश्चिम बंगालमध्ये भवानीपूरसह तीन जागांवर विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. कडक सुरक्षा आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूरमधून तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. दक्षिण कोलकाताच्या भवानीपूर जागेशिवाय मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर आणि समसेरगंज जागांवर पोटनिवडणुका होत आहेत.
केंद्रीय दलाच्या 72 तुकड्या तैनात
तीन मतदारसंघात केंद्रीय दलाच्या एकूण 72 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून त्यापैकी 35 तुकड्या भवानीपूरला पाठवण्यात आल्या आहेत, असे एका निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले. भवानीपूरच्या 97 मतदान केंद्रांवर उभारण्यात आलेल्या 287 बूथमध्ये प्रत्येकी तीन कर्मचारी तैनात केले आहेत. निवडणूक आयोगाने खराब हवामान लक्षात घेऊन सिंचन विभागाला सतर्क राहण्यास सांगितले आहे आणि सर्व मतदान केंद्रांवर पुराचे पाणी काढून टाकण्यासाठी पंप तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
#WestBengalBypolls | Security deployment at a polling booth of ward number 71 in Bhabanipur
Besides Bhabanipur, bypolls will also be held in Shamsherganj and Jangipur in the Murshidabad district. pic.twitter.com/P1HAShSrRX
— ANI (@ANI) September 30, 2021
38 ठिकाणी बॅरिकेड्स
सीआरपीसीच्या कलम 144 अंतर्गत प्रतिबंधक आदेश मतदान केंद्रांच्या 200 मीटरच्या आत लागू करण्यात आले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भवानीपूरमधील बूथच्या बाहेरची सुरक्षा कोलकाता पोलिसांकडे असेल आणि त्यांनी मतदारसंघात 38 ठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत.
रॅपिड अॅक्शन फोर्सही तैनात
भवानीपूरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आली आहे. याबरोबर रॅपिड अॅक्शन फोर्सदेखील तैनात केले जाईल. जंगीपूर आणि समसेरगंज मतदारसंघातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मतमोजणी 3 ऑक्टोबर रोजी होईल. बॅनर्जींच्या विरोधात भाजपच्या प्रियांका टिबरेवाल रिंगणात आहेत, तर माकपने श्रीजीब बिस्वास यांना तिकीट दिले आहे.
मतदानापूर्वी भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांनी सांगितले की, छापा व्होटिंग होऊ नये, ज्यांची मते आहेत त्यांनाच मतदान करा. लोकांना मत देण्यासाठी बाहेरून बोलावण्यात आले आहे. यावरून सरकार किती घाबरले आहे हे दिसून येते. बशीर हाटसारख्या भागात लोकांना बोलावण्यात आले आहे. यासह त्यांनी आवाहन केले की, लोकांनी कोणालाही घाबरू नये, मतदान करण्यासाठी यावे.
Bhawanipur Bypoll Voting BJP Priyanka Tibrewal allegations on TMC Of Booth Capturing CM Mamata Banerjee
महत्त्वाच्या बातम्या
- बेरोजगार कन्हैयाकुमारकडे १८ कोटी रुपयांची संपत्ती, खर्च चालवितात कसा हा देखील प्रश्न
- राहूल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या माध्यमांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी धमकावले, गुंडगिरी असल्याचा नेटीझन्सचा आरोप
- फी माफीसाठी विद्यार्थ्यांवर डोके आपटून घेण्याची वेळ, रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी महाविद्यालयात घटना
- कंगणाने पुन्हा करण जोहरला केले टार्गेट!