भारत जोडो यात्रा : केरळमध्ये पोस्टरवर ‘झाकलेले’ सावरकर कर्नाटकात पुन्हा ‘प्रकटले’

प्रतिनिधी

बेंगळूरू : काँग्रेस – भारत जोडो यात्रा आणि सावरकर या विषयावरचा वाद थांबायला तयार नाही. कारण केरळमध्ये पोस्टरवर झाकलेले सावरकर कर्नाटकात पुन्हा पोस्टरवर प्रकटले आहेत. Bharat Jodo Yatra: Savarkar ‘covered’ on posters in Kerala ‘reappears’ in Karnataka

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात भारत जोडो यात्रेची विविध पोस्टर्स लावली आहेत. त्यापैकी एका पोस्टरवर सावरकरांचे छायाचित्र झळकले आहे. या छायाचित्राबरोबरच राहुल गांधी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचीही पोस्टरवल छायाचित्रे आहेत. बंगलोर मधील शांतीनगरचे आमदार नलपद अहमद हरीस यांच्या नावाने ही पोस्टर्स लावल्याचे दिसले आहे. हा फोटो व्हायरल झाल्याबरोबर आमदार हरीस यांनी ताबडतोब पुढे येऊन खुलासा केला आहे भारत जोडो यात्रेत सावरकरांची पोस्टर्स आपण किंवा आपल्या समर्थकांनी लावलेली नसून ती काही असामाजिक तत्त्वांनी लावली आहेत. आम्ही पोलिसांकडे त्याबद्दल तक्रार केली आहे, असे सांगून ते मोकळे झाले आहेत.

पण काही झाले तरी सावरकर हा मुद्दा काही राहुल गांधींचा पिच्छा सोडायला तयार नाही, हेच यातून दिसून आले आहे. केरळमध्ये भारत जोडो यात्रा असताना अन्य स्वातंत्र्यसैनिकांसमवेत सावरकरांचेही छायाचित्र पोस्टरवर झळकले होते. तो फोटो व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी लगबगीने सावरकरांच्या छायाचित्रावर महात्मा गांधींचे छायाचित्र चिकटवून सावरकरांचे छायाचित्र झाकून टाकले होते. पण हे छायाचित्र झाकण्याचाही फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. एका नेत्याला निलंबित व्हावे लागले.

हा वाद संपून काही दिवस उलटले नाहीत, तोच कर्नाटकात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत काँग्रेसच्या पोस्टरवर सावरकर पुन्हा “प्रकटल्याने” नवा वाद तयार झाला आहे आणि थेट काँग्रेसच्या आमदाराला खुलासा देण्यासाठी पुढे यावे लागले आहे.

या मुद्द्यावरून भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे तो वेगळाच!! कितीही टाळायचे म्हटले तरी सावरकरांना वगळून देशाचा इतिहास लिहिता येणार नाही, अशी खोचक टिप्पणी भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केली आहे.

Bharat Jodo Yatra: Savarkar ‘covered’ on posters in Kerala ‘reappears’ in Karnataka

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात