बेळगावमध्ये भगवाच, पण भाजपचा; महाराष्ट्र एकीकरण समिती व कॉंग्रेसला झटका अन् शिवसेनाही तोंडावर

वृत्तसंस्था

बेळगाव : कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपने ३४ जागा जिंकल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट कायम असल्याचे त्या निमिताने पुन्हा स्पष्ट झाले. Belgaum Municipal corporation election BJP got landslide victory

या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि आक्रमकरित्या भाजपने प्रचार केला होता. दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचं राऊतांनी बोलून दाखवलेलं स्वप्न भंगले आहे.

या निवडणुकीत ३० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं निकालाकडे लक्ष लागलं होतं. अखेर भाजपने बेळगाव महापालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.

– बेळगाव महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत
– बेळगाव पालिकेसाठी २९ ही आहे मॅजिक फिगर
– भाजपला कमळ चिन्हाचा जोरदार फायदा
– भाजपने प्रथमच रचला इतिहास

बेळगाव निवडणूक अपडेट
महाराष्ट्र एकीकरण समिती : ३
भाजप : ३४
काँग्रेस : ८
अपक्ष : ८
एमआयएम : १

Belgaum Municipal corporation election BJP got landslide victory

महत्त्वाच्या बातम्या