पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे आपल्या विदेश दौऱ्यात आपल्या भाषणातून चमक दाखवलीच. जपानची राजधानी टोकियो मध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी असे काही विधान केले की ज्याची चर्चा देशा – परदेशात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. Because of the teachings I have got in my life, I have developed a habit that sentence
– मोठे लक्ष्य आणि संस्काराची बात
पंतप्रधान मोदी म्हणाले, मेरा लालन – पालन ऐसा हुआ है, मुझ पर जिन्होने ऐसे संस्कार किये है की हमारा लक्ष्य कभी छोटा नही होता है. हम बडे लक्ष्य के लिए काम करते है. मुझे मख्खनपर लकीर खिचने में मजा नही आता, मैं पत्थर की लकीर खिचता हूँ…!!, मोदींनी हे वाक्य उच्चारताच टोकियोच्या सभागृहातील श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि मोदी मोदी च्या घोषणा दिल्या!!
– 370 ते राम मंदिर
पण मोदींनी हे वाक्य उच्चारले या वाक्याचा नेमका अर्थ काय?? त्याचा संबंध अनेकांनी सध्या भारतात सुरू असलेल्या विविध राजकीय चळवळींशी जोडला. मोदींनी आपल्या कारकीर्दीत 370 कलम हटवून दाखवले. 70 वर्षात काँग्रेसने केले नाही ते आपल्या कारकीर्दीच्या सहाव्या वर्षी करून दाखवले. अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न न्यायालयाच्या चौकटी राहून सोडवून दाखवला. अयोध्येतील राम जन्मभूमी वर भव्य राम मंदिर उभे राहताना आता सगळे जग पाहते आहे. हीच ती “पत्थर पर लकीर”ची खरी बात आहे!!
#WATCH | Because of the teachings I have got in my life, I have developed a habit that "Mujhe makhan par lakeer karne mein maza nahi aata hain, main patthar par lakeer karta hoon," said Prime Minister Narendra Modi interacting with the Indian diaspora in Tokyo pic.twitter.com/vjODOVYNVK — ANI (@ANI) May 23, 2022
#WATCH | Because of the teachings I have got in my life, I have developed a habit that "Mujhe makhan par lakeer karne mein maza nahi aata hain, main patthar par lakeer karta hoon," said Prime Minister Narendra Modi interacting with the Indian diaspora in Tokyo pic.twitter.com/vjODOVYNVK
— ANI (@ANI) May 23, 2022
– काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर
त्याच बरोबर आता काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर बनतो आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन त्याचे उद्घाटनही झाले आहे. दुसर्या मोठ्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. ज्ञानवापी मशिदीचा वाद जरी न्यायप्रविष्ट असला तरी त्याचा नामनिर्देशन जणू पंतप्रधान मोदींनी “पत्थर पर लकीर खिचता हूँ, असे म्हणून केला आहे असे दिसते.
– आर्थिक संकटावर मात
मोदींनी आर्थिक क्षेत्रामध्ये करोडो अनिवासी भारतीयांना जोडून घेऊन कोरोनाच्या संकट काळापासून ते रशिया युक्रेन युद्धाच्या संकटा पर्यंत आर्थिक संकटावर मात करण्याची देखील विजिगिषु वृत्ती दाखवली आहे. करोडो अनिवासी भारतीयांना याचे निश्चित कौतुक आहे. त्यामुळे कोणीही कितीही परदेशात जाऊन देशात केरोसीन पसरले आहे, असे म्हटले तरी सरकारचे कामच असे बोलते, की ज्याला अनिवासी भारतीय परदेशातल्या भारतीय समुदाय प्रतिसाद देताना दिसतो!!
– काशी, मथुरेची कामे आपल्याच काळात
त्यामुळेच मोदी जिथे जातील तिथे भारतीय समुदायाला संबोधित करतात आणि त्यांना भावेल, रुचेल अशा भाषेत आपल्या सरकारची कामगिरी पोहोचवताना दिसतात. मोदींच्या स्वागताच्या वेळी जय श्रीराम, काशी विश्वनाथ धाम अशा घोषणा झाल्या जरूर. पण मोदींनी आपल्या भाषणात महात्मा गौतम बुद्धांची शिकवण, भारत आणि जपान यांच्यातील अध्यात्मिक वारसा यावरच भर दिला. त्यांनी ज्ञानवापी मशीद अथवा मथुरेतील शाही ईदगाह वाद या न्यायप्रविष्ट विषयांना थेट हातच घातला नाही… पण मख्खन पर लकीर खिचने में मजा नही आता, मैं पत्थर पर लकीर खिचता हूँ, असे सांगून त्यांनी काशी, मथुरा हे विषय वेगळ्या पद्धतीने छेडले. काशी, मथुरा येथील कामे देखील आपल्याच काळात होणार असल्याची ग्वाहीच जणू वेगळ्या शब्दांमध्ये मोदींनी भारतीय समुदायाला दिली. किंबहुना हेच मोदींच्या आजच्या भाषणाचे वैशिष्ट्य ठरले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App