मोदींवर बीबीसीची पक्षपाती डॉक्युमेंटरी; ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनकांनी बीबीसीसह पाकिस्तानी वंशाच्या खासदारालाही सुनावले!!

वृत्तसंस्था

लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सत्ता वर्तुळात किती प्रभाव आहे, याचे प्रत्यंतर ब्रिटनमधून आले आहे. ब्रिटिश ब्रोडकास्टिंग कॉर्पोरेशन बीबीसीने मोदींवर गुजरात दंग्यांसंदर्भात जी पक्षपाती डॉक्युमेंटरी प्रसारित केली आहे, त्या डॉक्युमेंटरीशी संबंधित प्रश्नावर ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सूनक यांनी बीबीसी आणि त्या डॉक्युमेंटरी वर आधारित प्रश्न विचारणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या खासदाराला ठणकावले आहे. BBBC targets Modi in documentary, but British PM rishi Sunak backs modi firmly

बीबीसीच्या डॉक्युमेंटरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी दाखवण्यात आलेल्या माहितीशी ब्रिटिश सरकार अजिबात सहमत नसल्याचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसैन यांनी ब्रिटिश संसदेत या वादग्रस्त डॉक्युमेंटरीवर उपस्थित केलेल्या प्रश्नावर ऋषी सुनक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.



भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील पंतप्रधान मोदींवरील डॉक्युमेंटरी पक्षपाती एकतर्फी आणि अपप्रचार करणारी असल्याची सडकून टीका केली आहे.

गुजरात दंगलीवेळी त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर भूमिकेवर टीका करणारी एक डॉक्युमेंटरी बीबीसीने प्रसारित केली आहे. त्यानंतर यावरुन वाद निर्माण झाला असून पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसेन यांनी हा विषय ब्रिटनच्या संसदेतही उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना ऋषी सुनक म्हणाले की, याबाबत ब्रिटन सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही. ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या विरोधात आम्ही नेहमीच भूमिका घेतली आहे. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधित या डॉक्युमेंटरीमध्ये जे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत त्यांच्याशी मी अजिबात सहमत नाही.

भारताचा बीबीसीवर पक्षपाताचा आरोप 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही बीबीसीची डॉक्युमेंटरी पूर्णपणे पक्षपाती, अपप्रचार करणारी आहे, असा आरोप केला आहे. इतकेच नाही तर बीबीसीची डॉक्युमेंटरी हा ब्रिटिशांचा वसाहतवादी दृष्टिकोनच पुढे रेटत असल्याची टीकाही परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केली आहे.

 गुजरात दंग्यांचाच विषय उगाळला

BBC ने 2002 सालच्या गुजरात दंगलीच्या वेळी त्यावेळचे मुख्यमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाला लक्ष्य करणारी, त्यावर टीका करणारी “India: The Modi Question” ही दोन भागांची मालिका प्रसारित केली आहे. या डॉक्युमेंटरीवर अनेक स्तरातून टीका सुरू झाल्यानंतर ती निवडक प्लॅटफॉर्मवरून काढून टाकावी लागली आहे.

भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिकांनी या मालिकेचा निषेध केला. बीबीसीने एक अब्जाहून अधिक भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत, अशा प्रकारच्या नाराजीचा सुरू त्यांच्यातून उमटला आहे.

BBC targets Modi in documentary, but British PM rishi Sunak backs modi firmly

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात