वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटकात सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून राज्यात खळबळ उडाली आहे. आता बजरंग दलाच्या चंदीगड युनिटने या प्रकरणी काँग्रेसला मानहानीची नोटीस पाठवली आहे. संघटनेने 100 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
बजरंग दल चंदीगडने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसने बजरंग दलाच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केले आहे. तसेच त्याची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारख्या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशीही करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेनेही या नोटिशीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि “जागतिक स्तरावर हिंदूंच्या भावना दुखावल्याची किंमत काँग्रेस पक्षाला चुकवावी लागेल” असे म्हटले आहे.
कर्नाटकात बजरंग दलावर बंदी; काँग्रेसने खाल्ली हापटी; बोला, जय बजरंग बली!!
खरगे यांनी दिला ‘बजरंग बली’चा नारा
कर्नाटकातील निवडणुकीत राजकीय आरोप – प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जय बजरंग बली’च्या घोषणा देऊन भाषणाची सुरुवात आणि शेवट करत होते, आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही ‘जय बजरंग बली’चा नारा लावायला सुरुवात केली आहे.
ही मोठी बाब आहे, कारण कर्नाटक निवडणुकीसाठी जारी करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात काँग्रेसने जिंकल्यानंतर बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. तेव्हापासून काँग्रेस आणि बजरंग दल यांच्यात खडाजंगी सुरू आहे. बजरंग दल काँग्रेसला विरोध करत आहे. खरगे यांनी ‘जय बजरंग बली, फोड दो भ्रष्टाचार की नली’ अशी घोषणाबाजी केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App