उत्तर प्रदेशात चालला कायद्याचा दंडा; बाहुबली माजी खासदार अतीक अहमदची 123 कोटी रुपयांची संपत्ती जप्त


वृत्तसंस्था

प्रयागराज : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा कायद्याचा दंडा चालविला आहे. गुजरातच्या साबरमती जेलची हवा खाणारा बहुजन समाज पक्षाचा माजी खासदार आणि बाहुबली नेता अतीक अहमद याची तब्बल 123 कोटी रुपयांची संपत्ती योगी सरकारने जप्त केली आहे. Baahubali former MP Atiq Ahmed’s assets of Rs 123 crore seized

प्रयागराज जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोनच दिवसांपूर्वी 21 नोव्हेंबर 2022 रोजी अतीक अहमदची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार उत्तर प्रदेश पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत अतीक अहमदची याची 123 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

ही संपत्ती झाली जप्त

  • अतीक अहमदने हवेलिया झूंसी मध्ये आपले वडील हाजी फिरोज आणि काका उस्मान अहमद तसेच अफरोज अहमद यांच्या नावावर जमीन खरेदी केली होती. या सगळ्या जमिनीची किंमत 123 कोटी रुपये आहे.
  • जप्त केलेली पहिली जमीन 1.8260 हेक्टर हाजी फिरोज आणि त्याचे भाऊ उस्मान व अफरोज यांच्या नावावर आहे. तिची किंमत
    76 कोटी 16 लाख रुपये आहे.
  • दूसरी जमीन 1.1300 हेक्टर असून ती उस्मानच्या नावावर आहे. तिची किंमत 47 कोटी 12 लाख 40 हजार आहे.
  • ही सर्व संपत्ती आज 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रयागराज जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जप्त करण्यात आली आहे.

अतीकच्या भावाचीही संपत्ती जप्त

याआधी 18 नोव्हेंबर 2022 रोजी अतीक अहमदचा भाऊ अजीम उर्फ अश्रफ अहमद याचीही कोट्यावधी रुपयांची संपत्ती अशीच जप्त करण्यात आली आहे. देवघाट झलवा मध्ये अश्रफ आणि त्याच्या गुंडांनी 14 बिघे जमिनीवर अवैध कब्जा केला होता. ही सर्व जमीन 18 ऑक्टोबर 2022 रोजी जप्त करण्यात आली आहे.

Baahubali former MP Atiq Ahmed’s assets of Rs 123 crore seized

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण