सीबीआय, ईडीच्या भीतीपोटी मायावती झाल्या मवाळ, भीम आर्मीचा आरोप

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – केंद्रीय संस्थांकडून चौकशी होण्याच्या भीतीने बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती मवाळ बनल्या आहेत, असा आरोप भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केला आहे. Azad targets BSP leader Mayawati

ते म्हणाले की, सीबीआय, ईडी अशा संस्था तुमच्यावर खटले भरतात तेव्हा तुम्ही केंद्राच्या पकडीखाली सापडता. तुम्ही तुमची मते ठामपणे मांडू शकत नाहीत. त्यामुळेच बसपची विविध समस्यांवरील भूमिका सौम्य राहिली आहे. मायवती आणि त्यांच्या भावावर अनेक खटले भरण्यात आले आहेत. बसप रसातळाला जात आहे, कारण त्यांच्या नेत्यांना समाजात प्रत्यक्ष जाऊन काम करायचे नाही. आम्ही कामाच्या जोरावर आमची गुणवत्ता दाखवून दिली. निवडणुकीच्या आधी आणि त्यानंतर लोकांबरोबर राहण्याची आमची प्रतिज्ञा आहे.


उत्तराखंडमध्ये राजकीय पेचप्रसंग, मुख्यमंत्री झाल्यावर सहा महिन्यांत निवडून न येता आल्यामुळे तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा


ते म्हणाले की, भाजपला सत्तेवर पुन्हा येण्यापासून रोखायचे असेल तर आगामी निवडणूकीसाठी महायुती ही काळाची गरज आहे. जनतेसाठी महायुती तयार करण्याच्यादिशेने आमचे प्रयत्न सुरु आहेत. पक्ष सत्तेवर ताबा मिळवितात तेव्हा हुकुमशाहीची स्थिती निर्माण होते. उत्तर प्रदेशात हेच झाले आहे. बसपचे कार्यकर्ते फक्त निवडणुकांच्या वेळी जनतेकडे जातात. लोकांना हे कळून चुकले आहे. केरळ, आसाम, पश्चिम बंगाल अशा ठिकाणी त्यांना मिळालेली मते एक टक्क्यांपेक्षा कमी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या