वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताशी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर संदर्भात डील करणारी फर्म फिनमेकॅनिका अर्थात सध्याची लिओनार्डो या फर्मशी डील करण्यासंदर्भातली बंदी भारतीय संरक्षण मंत्रालयाने उठविली आहे. Augusta Westland; The ban on the Italian firm was lifted by the Indian Ministry of Defense
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर संदर्भात डील करताना भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर 2013 – 14 मध्ये या फर्मवर भारतात बंदी घालण्यात आली होती. ऑगस्टा वेस्टलँड संदर्भात भ्रष्टाचाराचा आरोप असला तरी फर्मने भारतातल्या VVIP साठी 3600 कोटी रुपयांच्या 10 चॉपर्सची ऑफर दिली होती. त्यानंतर संबंधित फर्मवर बंदी घालण्यात आली.
ऑगस्टा वेस्टलँडच्या भ्रष्टाचाराचा विषय सीबीआय तसेच अन्य केंद्रीय तपास संस्थांनी हातात घेऊन त्याची सखोल चौकशी आणि तपास केला. त्याच्या दोन केसेस सध्या कोर्टामध्ये सुरू आहेत. परंतु दरम्यानच्या काळात फिनमेकॅनिका ही फर्म बंद करून तिने नवे रूप धारण केले. तिचे नाव लिओनार्डो ठेवण्याचा आले. आता या फर्मशी डील करण्यात भारतीय संरक्षण मंत्रालयाला काही प्रत्यवाय नाही.
g-20 देशांच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच इटलीमध्ये होते. त्यांनी इटलीच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय वाटाघाटी देखील केल्या. हा दौरा संपल्यानंतर आता इटालियन फर्म लिओनार्डो वरील बंदी भारतीय संरक्षण मंत्रालयाने उठवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App