वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला असून तीन ठार, २२ जखमी जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात हल्ला झाला असून हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. तहरीक-ए-तालिबानवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. सर्व जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये लष्कराचे किती लोक जखमी किंवा मारले गेले आहेत, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. Attack In Tank Khyber Pakhtunkhwa:Major Terrorist attack on Pakistan paramilitary forces: Three killed, 22 injured
आत्मघाती बॉम्बहल्ले केल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोर बॉम्ब लावून कॅम्पमध्ये घुसले होते. या हल्ल्यासाठी टीटीपीला जबाबदार धरले जात आहे.आताच्या हल्ल्यातील दहशतवाद्यांकडे अमेरिकी शस्त्रास्त्रे होती. ३ दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच या भागात जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App