विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनचा पराभव केला आहे. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक के नटराजन यांची जहाजांवरील सशस्त्र दरोडे आणि पायरसी विरुध्द लढण्यासाठीच्या अशिया समितीचे कार्यकारी संचालक बनले आहेत. सिंगापूर हे या प्रादेशिक संघटनेचे मुख्यालय आहे.At the international level, India defeated China. Natanajan became the executive director
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नटराजन यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे की सागरी सुरक्षेसाठी भारताच्या योगदानाची दखल अशियातील देशांनी घेतली आहे. या समितीमध्ये एकूण २१ देश आहेत. त्यामध्ये भारताने दोन तृतीयांश बहुमत मिळाले. फिलिपिन्सला तीन मते मिळाली, तर चीनला चार मते मिळाली. नवीन कार्यकारी संचालक 2022 मध्ये पदभार स्वीकारतील अशी अपेक्षा आहे.
म्यानमार, बांगलादेश आणि श्रीलंकेने मोदी प्रशासनाला पाठिंबा दिला, तर थायलंड सारख्या इतर आग्नेय आशियाई देशांनी चीनला आणि सिंगापूरने फिलिपिन्सला समर्थन दिले. कंबोडिया आणि लाओससारख्या राज्यांनी बीजिंगच्या बाजूने प्रचंड मतदान केले.
क्वाडच्या सदस्यांसह इतर सर्व पाश्चिमात्य देशांनी भारताला मतदान केले. यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांच्यासह डेन्मार्क, युनायटेड किंगडम, जर्मनी, नेदरलँड्स, जर्मनी आणि नॉर्वे यांचा समावेश आहे. जहाजांवरील सशस्त्र दरोड्याविरूद्धच्या लढाईत सहकायार्ला प्रोत्साहन आणि बळकट करण्यासाठी आशियातील ही समिती काम करते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App