विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्पादन व पुरवठ्यातील गुंतागुंतीमुळे टंचाई असल्याचे उत्पादक कंपन्यांनी कारण पुढे केल्याने कॉंग्रेसने केंद्र सरकारला लसपुरवठ्याचे कॅगद्वारे ऑडिट करावे असा सल्ला दिला आहे.Ask CAG for took audit regarding vaccine supply
देशातील दोन्ही लसनिर्मात्या कंपन्यांनी किती उत्पादन केले याचा तपशील कळायला हवा, अशीही मागणी कॉंग्रेसने केली आहे.कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी बेपत्ता लसीचे रहस्य वाढत असल्याचे उपरोधिक ट्विट करून सरकारला उत्पादक कंपन्यांकडून लसपुरवठ्याचे कॅगमार्फत ऑडिट करण्याचे सुचविले.
चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की बेपत्ता लसीचे रहस्य दररोज वाढत चालले आहे. लसीच्या एका बॅकच्या उत्पादनासाठी आवश्यक कालावधीबद्दल भारत बायोटेकच्या वक्तव्याने संभ्रम वाढवला आहे. उत्पादनाची क्षमता आणि उत्पादन या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत.
आपल्याला देशातील दोन्ही उत्पादक कंपन्यांनी आतापर्यंत केलेल्या उत्पादनाचे नेमके प्रमाण समजायला हवे. उत्पादनाचे प्रमाण कळाल्यानंतर हे तारखेनिहाय किती आणि कोणाला पुरवठा करण्यात आला हे देखील कळायला हवे.
देशांतर्गत दोन्ही उत्पादकांची क्षमता, एकूण उत्पादक, पुरवठा आणि ग्राहकांची यादी ही माहिती लेखापरिक्षणासाठी कॅगकडे सोपविणे योग्य राहील. लसटंचाईमुळे जनतेने रस्त्यावर उतरून राग व्यक्त करण्याआधी बेपत्ता लसीचे रहस्य सोडविले जाणे आवश्यक आहे, असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App