आर्यन खानची बेल ऍप्लिकेशन कोर्टाने नाकारली, दिग्दर्शक राहुल ढोकालीया आणि अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विटद्वारे न्यायव्यवस्थेवर उठवले प्रश्न


विशेष प्रतिनिधी

मुबंई : एनडीपीएस कोर्टाने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची बेल अँप्लिकेशन रिजेक्ट केली आहे. यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील बरेच मोठे आरोप एनसीबी, समीर वानखेडे आणि भाजप यांच्यावर केले आहेत. हा महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा डाव आहे असा अाराेप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांच्या या आरोपांनंतर रईस सिनेमाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Aryan Khan’s bail application rejected by court, director Rahul Dhokaliya and actress Swara Bhaskar raise questions on justice

राहुल ढोकालीया यांनी रईस या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. आपल्या ट्विटर हॅण्डलचा आधार घेत ते लिहितात, ‘हे खूपच जास्त शॉकिंग आहे. व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे आर्यनचे इंटरनॅशनल रॅकेटसोबत संबंध असण्याची ‘शक्यता’ तुम्ही सांगत आहात. इतके दिवस त्याला कस्टडीमध्ये ठेवूनसुद्धा तुम्हाला काहीही सिद्ध करतात  आलेले नाहीये. #freeaaryankhan हा हॅशटॅग वापरत आपले मत राहुल यांनी व्यक्त केले आहे.


AARYAN KHAN :गौरी खानची ‘मन्नत’अपूर्ण!सध्या ‘खीर’ नाहीच …तुरुंगात आर्यन ढसाढसा रडायचा-जेवण आवडत नसल्याने फक्त पार्ले बिस्किट खायचा…


तर अभिनेत्री स्वरा भास्करने देखील ट्विटर हॅन्डलवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती लिहिते, “कायद्याच्या रक्षण कर्त्यांकडून आज कायद्याचा त्याग झाला.”

आर्यन खान कडे कोणत्याही प्रकारचे ड्रग सापडले न्हवते. आर्यन ची बेल ऍप्लिकेशन योग्य कोर्टात सादर न केल्यामुळे आणि तारखेचे कारण देत कोर्टाने ह्याआधीही त्याची बेल ऍप्लिकेशन नाकारली होती. बॉलिवूड मधील बऱ्याच कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट करून किंग खानला आपला सपोर्ट दर्शवला होता.

Aryan Khan’s bail application rejected by court, director Rahul Dhokaliya and actress Swara Bhaskar raise questions on justice

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण