विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चिडीचूप बसणार आहेत. ऐवढेच नव्हे तर दहा दिवसांसाठी गायबही होणार आहे. याचे कारण म्हणजे ते विपश्यना शिबिराला गेले आहेत.केजरीवाल रविवारपासून 10 दिवसांच्या विपश्यना शिबिराला गेले आहेत.Arvind Kejriwal disappears for ten days
पुढचे 10 दिवस ते कुणाच्याही संपर्कात नसतील. ते टीव्ही आणि वर्तमानपत्रे यांच्यापासूनही दूर राहतील, असं सांगण्यात आलं आहे. यापूवीर्देखील अनेकदा केजरीवाल हे विपश्यनेसाठी गेले आहेत.केजरीवाल हे राजकारण येण्यापूवीर्पासूनच विपश्यना करत आहेत.
वषार्तून किमान 2 वेळा ते विपश्यनेला जात असतात. यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारानंतरदेखील ते विपश्यनेला गेले होते. महाराष्ट्रातील इगतपुरी, हिमाचल प्रदेशातील धर्मकोट यासह देशातील अनेक विपश्यना केंद्रांवर जाऊन त्यांनी विपश्यना केली आहे.
विपश्यनेच्या या 10 दिवसांच्या कालावधीत केजरीवाल यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क असणार नाही. दिल्लीतील आणि देशातील कुठल्याही घडामोडी त्यांना समजू शकणार नाहीत. त्यांच्याकडे ना टीव्ही असेल, ना मोबाईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App