विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केलेले ट्विट वादात सापडले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी स्वत:ची तुलना भगतसिंगांशी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर होतो आहे. त्यांचे माजी कुमार विश्वास यांनी त्यांच्यावर दहशतवाद्यांशी जवळीक असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांनी हे ट्विट केले होते.Arvind Kejriwal compares himself to Shaheed Bhagat Singh in new controversy
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे यासंदर्भात तपासाची मागणी केली आहे. केजरीवाल यांचा दहशतवाद्यांशी काही संबंध आहे का, हे तपासण्यात यावं, अशी त्यांनी मागणी केली आहे. केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलंय की, हे सगळे भ्रष्टाचारी मला दहशतवादी म्हणत आहेत.
मी जगातला पहिला असा दहशतवादी आहे जो लोकांसाठी शाळा बनवतो, हॉस्पिटल्स उघडतो आणि वीज कनेक्शन ठीक करतो. मी जगातला पहिला ‘स्वीट दहशतवादी’ आहे. ब्रिटीश भगतसिंगाला घाबरत होते. म्हणून ते त्यांना दहशतवादी म्हणत होते. मी भगतसिंगांचा चेला आहे.
त्यांच्या या ट्विटनंतर काँग्रेस, भाजपसहित अनेक राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घेतला आहे. केजरीवाल हे स्वत:ची तुलना भगतसिंगांशी करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेता गौतम गंभीर यांनी ट्विट करत म्हटलंय की, भगतसिंगाने आपलं आयुष्य या देशासाठी समर्पित केलं आहे. त्याने स्वत:च्या शरीराचे तुकडे होऊ दिले मात्र, त्याने देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत. सत्तेसाठी त्याचं नाव वापरणं लज्जास्पद आहे.
पंजाब काँग्रेसनेही त्यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी म्हटलंय की, अरविंद केजरीवालांनी स्वत:ची तुलना भगतसिंगांशी करण्यावर आम्ही आक्षेप नोंदवत आहोत. हा राष्ट्रीय नायकाचा अनादर आहे. केजरीवाल यांनी ड्रग्जच्या व्यापारातील कुख्यात गुन्हेगार असलेल्या मजिठियाची माफी मागितली होती.
मतांसाठी त्यांनी पंजाबविरोधी असलेल्या दहशतवाद्यांशी हातमिळवणी केली आहे. शहिद भगतसिंगांसोबत स्वत:ची तुलना करणे हा राष्ट्रीय नायकाचा अनादर आहे.शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुवेर्दी यांनीही यावर टीका केली असून त्यांनी म्हटलंय की, कृपा करुन तुमच्या राजकारणासाठी शहिद भगतसिंगांसारख्या भारतमातेच्या धाडसी सुपुत्र यांच्यासोबत तुलना करु नका.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App