WATCH : कोरोनावरील उपचारासाठी नवे औषध, सात दिवसांत RTPCR निगेटिव्ह

approval for Virafin medicine by Zydus to emergency use for cororna treatment

कोरोनाचा पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी ज्याप्रकारे कोणतीही लस उपलब्ध नव्हती त्याच प्रकारे एकदा कोरोनाची लागण झाली की, त्याच्यावर उपचारासाठी कोणतंही ठोस औषधही नाही. लक्षणांनुसार डॉक्टर रुग्णांचा उपचार करत असून त्यांना त्या पद्धतीनं औषधं दिली जात आहेत. त्यामुळं वेगवेगळ्या औषधांचा वापर कोरोनाच्या उपचारासाठी केला जात होता. मात्र आता झायडस कंपनीच्या Virafin या औषधाला मंजुरी देण्यात आली आहे. डीसीजीआयनं म्हणजे ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं या औषधाला मंजुरी दिलीय. कोरोनाची लागण झालेल्या सुरुवतीच्या काळात किंवा सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी हे औषध रामबाण उपाय ठरणार असल्याची चर्चा आहे. या औषधामुळं अवघ्या सात दिवसात आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येणार असल्याचा दावा झायडस कंपनीनं केला आहे. कंपनीनं केलेल्या चाचणीत रुग्णांवर या औषधांचा चांगला परिणाम होत असल्याचं सिद्ध झाल्याचा दावा कंपनीनं केला आहे. approval for Virafin medicine by Zydus to emergency use for corona treatment

हेही पाहा – 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था