महिलाशक्तीला मोदी सरकारचे आणखी बळ, बीआयएस सर्टीफिकेटसाठीच्या फीमध्ये सवलत


देशातील उद्योगातील महिला शक्तीला आणखी बळ देण्यासाठी मोदी सरकारने पाऊल टाकले आहे. ब्युरो आॅफ इंडियन स्टॅँडर्ड (बीआयएस) सर्टीफिकेटसाठी वार्षिक फीमध्ये महिलांना सवलत मिळणार आहे.Another strength of Modi government for women power, concession in fees for BIS certificate’


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : देशातील उद्योगातील महिला शक्तीला आणखी बळ देण्यासाठी मोदी सरकारने पाऊल टाकले आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅँडर्ड (बीआयएस) सर्टीफिकेटसाठी वार्षिक फीमध्ये महिलांना सवलत मिळणार आहे.

व्यापारमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, सरकारने महिला उद्योजक, स्टार्टअप आणि लघुउद्योगांना बीआयएस सर्टीफिकेट घेणे शक्य व्हावे यासाठी वार्षिक फीमध्ये सवलत देण्यात आली आहे. यामध्येही महिला उद्योजकांच्या उद्योगांना अतिरिक्त दहा टक्के सवलत मिळणार आहे.व्होकल फॉर लोकल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या नाºयाला यामुळे आणखी बळ मिळेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.कोणतेही उत्पादन हे प्रमाणित करण्यासाठी बीआयएस सर्टीफिकेट आवश्यक असते. उत्पादनाची गुणवत्ता आणि क्षमता तपासून हे सर्टीफिकेट दिले जाते.

नव्या उत्पादनाला आपले उत्पादन बीआयएस प्रमाणित करून घेण्यासाठी एक हजार रुपये प्रवेश शुल्क आणि इन्स्पेक्शनसाठी दर माणसी दिवसाला सात हजार रुपये आकारले जातात. त्याचबरोबर बीआयएसचा निर्णय झाल्यावर लायसन्साठी वार्षिक एक हजार रुपये आणि एखाद्या उद्योगासाठी प्रमाणित केलेली फी द्यावी लागते.

बीआयएसचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी आणि ग्राहक विभागाच्या सचिव लीना नंदन यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की आता बीआयएस सर्टीफिकेयची संपूर्ण प्रक्रिया ही ऑटोमॅटीक होणार आहे. त्यासाठी ई-बीआयएस पोर्टल सुरू करण्यात आली आहे. या नवीन सिस्टीममध्ये लायसन्सचे नूतनीकरणही ऑ टोमॅटीक होणार आहे. विलंब टाळण्यासाठी अर्जाची प्रत्येक टप्यावरील माहिती मिळणारआहे.

Another strength of Modi government for women power, concession in fees for BIS certificate’

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण