वृत्तसंस्था
कोटा – आंतरराष्ट्री वॉन्टेड दहशतवादी गँगस्टर दाऊद इब्राहीम याच्या डोंगरीतील ड्रग्ज फॅक्टरीचा मॅनेजर दानिश चिकणाला राजस्थानच्या कोटामधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) अटक केली आहे. दानिश चिकणावर हत्येसह ६ गंभीर गुन्हे मुंबई पोलीसांमध्ये दाखल आहेत. anish Chikna (in pic), who managed the drugs factory of gangster Dawood Ibrahim in Maharashtra’s Dongri, arrested from Rajasthan’s Kota last night in a joint operation of Kota Police & NCB
बॉलिवूडमध्ये ड्रग्ज माफियागिरी करून रॅकेट चालविणाऱ्यांवर सध्या एनसीबीची जोरदार धडक कारवाई सुरू आहे. या करावाईतला आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा गुर्गा दानिश चिकणाच्या रूपात एनसीबीच्या हाताला लागला आहे.
एनसीबीने ड्रग्ज माफिया – ड्रग्ज पेडलर्स आणि बॉलिवूडचे कनेक्शन खणून काढायला सुरूवात केल्यानंतर आत्तापर्यंत ४२ जणांना अटक केली आहे. त्यात एजाज खानसारखे स्टार्स तसेच अनेक ड्रग्ज पुरवठादारांचा समावेश आहे. ड्रग्ज पेडलर्सची साखळी तोडून काढण्याचा एनसीबीचा प्रयत्न आहे.
Danish Chikna (in pic), who managed the drugs factory of gangster Dawood Ibrahim in Maharashtra's Dongri, arrested from Rajasthan's Kota last night in a joint operation of Kota Police & NCB. Drugs seized from his vehicle. 6 cases, including that of murder, registered against him. pic.twitter.com/JyOHdAGiax — ANI (@ANI) April 2, 2021
Danish Chikna (in pic), who managed the drugs factory of gangster Dawood Ibrahim in Maharashtra's Dongri, arrested from Rajasthan's Kota last night in a joint operation of Kota Police & NCB. Drugs seized from his vehicle. 6 cases, including that of murder, registered against him. pic.twitter.com/JyOHdAGiax
— ANI (@ANI) April 2, 2021
दानिश चिकणा या साखळीतली आत्तापर्यंत अटक झालेली सगळ्यात मोठी कडी आहे. त्याच्यामार्फत त्याच्या गॉडफादरपर्यंत पोहोचण्याचे धागेदोरे एनसीबीला मिळणे अपेक्षित आहे. एनसीबीच्या टीमने कोटा पोलीसांच्या मदतीने काल रात्री सर्च ऑपरेशन करून दानिश चिकणाला एका बड्या हॉटेलमधून रंगेहाथ पकडले. त्याच्याजवळून ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत. दानिशवर हत्येसहीत ६ गंभीर गुन्हे मुंबई पोलीसांमध्ये दाखल आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App