विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वामी शिवानंद या १२५ वर्षांच्या योग्याने राष्ट्रपतींना नतमस्तक होऊन नमस्कार केला. हे पाहून भारतीय संस्कृतीच्या महानतेचे दर्शन घडवित पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामी शिवानंद यांच्यासमोर नतमस्तक झाले.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.And Prime Minister Narendra Modi bowed down, appeared at the Padka Award Ceremony of Indian Rites
यावेळी योगाच्या क्षेत्रात उल्लेखनीय आणि अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या स्वामी शिवानंद यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी स्वामी शिवानंद यांनी उठून सगळ्यात आधी गुडघ्यावर टेकून नतमस्तक होत दोन्ही हात जोडून उपस्थितांना वंदन केलं. यावेळी समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह आणि इतर दिग्गजही बसले होते.
स्वामींची ही कृती पाहून मोदीही भारावून गेले. ते उठले आणि त्यांनीही वाकून जमिनीला हात टेकले.यानंतर स्वामी शिवानंद पुरस्कार घेण्यासाठी राष्ट्रपतींच्या दिशेनं गेले. तिथेही त्यांनी रामनाथ कोविंद यांना आदरपूर्वक नमस्कार केला. यानंतर राष्ट्रपतींनी आपल्या जागेवरुन उठून स्वामी शिवानंद यांना नमस्कार केला.
स्वामी शिवानंद हे 125 वर्ष वयाचे असून त्यांनी योगा क्षेत्रात भरीव योगदान दिलेलं आहे. योग सेवक या नावानं ते प्रसिद्ध आहे. वाराणसीमध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यावेळी 128 जणांना पद्म पुरस्कार देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.
त्यापैकी चार पद्म विभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 जणांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यात बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविद यांन जीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांना या पुरस्कार सुपुर्द केला. गेल्या वर्षी बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App