दलित अधिकाऱ्याची हत्या करणारा बिहारचा डॉन माजी खासदार आनंद मोहनची मुलाच्या लग्नासाठी “खास” तरतुदीने नितीश कुमारांकडून सुटका!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बिहार मधला डॉन माजी खासदार आनंद मोहन याला दलित अधिकाऱ्याची हत्या केल्याबद्दल दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र नितीश कुमार – तेजस्वी यादव सरकारने नियमांमध्ये बदल करून “खास तरतुदीद्वारे” आनंद मोहन याची त्याच्या मुलाच्या लग्नासाठी सुटका केली. आणि इतकेच नाही, तर आनंद मोहनच्या मुलाच्या लग्नाला मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आपल्या लव्याजम्यासह हजरही राहिले. Anand Mohan, don turned politician and former MP, Independent India’s first politician to be awarded life imprisonment

गोपालगंजचे डिस्ट्रिक्ट मॅजेस्टिक दलित आयएएस अधिकारी जी. कृष्णैया यांच्या हत्येबद्दल त्यावेळेचा अपक्ष खासदार आनंद मोहन याला न्यायालयाने दोषी ठरविले होते. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो ती शिक्षा भोगतच होता. पण नितीश कुमार यांच्या सरकारने बिहारच्या तुरुंग अधिनियमात परस्पर बदल करून आनंद मोहनची सुटका केली. त्यासाठी त्याच्या मुलाच्या लग्नाचे निमित्त दाखविले. “प्रत्यक्ष कामकाजावर असलेल्या सरकारी अधिकारी – कर्मचाऱ्यांची हत्या” या विषया संदर्भातले कलम आनंद मोहनच्या शिक्षेतून वगळले.

आनंद मोहन याची तुरुंगातून सुटका केल्यानंतर त्याच्या समर्थकांनी एखाद्या हिरो सारखे त्याचे स्वागत केले. त्याच्या मुलाचा लग्न समारंभ देखील थाटात झाला. स्वतः नितीश कुमार आणि तेजस्वी यादव त्याच्या मुलाच्या लग्नाला सरकारी लव्याजम्यासह हजर राहिले. या स्वागत समारंभाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत असून नितीश कुमार यांच्या सरकारच्या कायदा व सुव्यवस्थेवर अनेक जण प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

त्याचबरोबर गँगस्टर माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी लिबरल जमात आनंद मोहनच्या सुटकेनंतर मात्र मूग गिळून गप्प आहे, यावरही अनेकांनी शरसंधान साधले आहे.

देशातल्या सेक्युलर राज्यांमध्ये अनेक गुंड – माफियांची पापे सेक्युलरिझमच्या नदीत अंघोळ केल्यानंतर धुतली जातात, अशा शब्दांमध्ये अनेकांनी टीकास्त्र सोडले आहे.

Anand Mohan, don turned politician and former MP, Independent India’s first politician to be awarded life imprisonment

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात