Amitabh Bachchan Injured : हैदराबादेत ‘ Project K’ चित्रपटाच्या शूटींगवेळी अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत!

Amitabh Bachchan

बरगड्यांना मार लागल्याने शूटींग अर्धवट सोडून मुंबईत परतलेल्या अमिताभ बच्चन यांनी दुखपतीबाबत स्वत: दिली आहे माहिती.

विशेष प्रतिनिधी

Amitabh Bachchan Gets Injured:  बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांना हैदराबादमध्ये दुखापत झाली आहे. हैदराबादमध्ये चित्रपटाची शुटींग दरम्यान ही घटना घडली आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.  आपला आगामी चित्रपट ‘प्रोजेक्टे के’साठी मारहाणीच्या प्रसंगाची शूटींग सुरू असताना अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली. त्यानंतर ते हैदराबादेतून मुंबईत आपल्या घरी परतले आहेत. Amitabh Bachchan injured during the Project K shooting of an action scene accident on the set in Hyderabad

या संदर्भात माहिती देताना अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले की, हैदारबादेत प्रोजेक्ट के च्या शूटींग दरम्यान एका मारहाणीच्या प्रसंगात मला दुखापत झाली. बरगडीला मार लागला आहे, उजव्या बरगडीची मांसपेशी फाटली आहे. शूटींग रद्द केले आहे. एआयजी रुग्णालयात स्कॅन केले आणि हैदराबादेतून घरी परतलो आहे. पट्टी बांधली आहे आणि उपचार सुरू आहेत. दुखावत आहे, हालचाल करण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. ठीक होण्यास काही आठवडे लागतील. वेदना कमी व्हाव्यात म्हणून औषध घेणे सुरू आहे.

”…त्यामुळे मला वाटत नाही अशाप्रकारे पत्र लिहून यातून कोणाची सुटका होईल’’ विरोधकांनी मोदींना पाठवलेल्या पत्रावर फडणवीसांचं विधान!

याशिवाय अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, ‘’दुखापतीमुळे सर्व कामं थांबवली आहेत. जोपर्यंत संपूर्ण उपचार होत नाही, तोपर्यंत सर्व काम बंद असतील. सध्या मी जलसा येथे आराम करत आहे. आवश्यक कामकाजासाठी जरावेळ मोबाईलवर आहे, बाकीवेळ आराम सुरू आहे. सांगण्यास वाईट वाटते परंतु आज संध्याकाळी मी जलसाच्या गेटवर चाहत्यांना भेटू शकणार नाही. तरी कृपया कोणी येऊ नये आणि जे कोणी येणार असतील त्यांनाही कळवावे, बाकी सर्व ठीक आहे.’’ असंही अमिताभ बच्चन यांनी सांगितलं आहे.

अभिनेता प्रभास प्रमुख भूमिकेत असलेल्या प्रोजेक्ट के या चित्रपटत अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिपिका पदुकोनही दिसणार आहे. ही चित्रपट १२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहेत. हा चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात मोठा चित्रपट असल्याचं  सांगितलं जात आहे.

Amitabh Bachchan injured during the Project K shooting of an action scene accident on the set in Hyderabad

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात