१७ महिन्यांच्या बालकाच्याा दुर्धर आजाराबाबत समजल्यावर अमिताभ बच्चनही झाले भावूक, १६ कोटी उपचाराच्या खर्चासाठी स्वत;ही करणार मदत


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोण बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमात ऐरवी हास्याचे फवारे उडतात. परंतु, निर्मात्या-नृत्यदिग्दर्शक फराह खान यांनी एक कहाणी सांगितली आणि महानायक अमिताभ बच्चन भावूक झाले. १७ महिन्यांच्या बालिेकच्या दुर्धर आजाराची आणि त्यासाठी लागणाऱ्या १६ कोटी रुपये खर्चाची माहिती समजल्यावरआपणही काही मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.Amitabh Bachchan gets emotional after learning about 17-month-old boy’s illness

कोण बनेगा करोडपतीच्या हॉटसिटवर अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि फराह खान या होत्या. यावेळी फराह खान यांनी २५ लाख रुपयांची रक्कम जिंकली. या रकमेचे काय करणार याबाबत सांगताना अमिताभ बच्चन म्हणाले, फराह खान हा खेळ अयांश मदन नावाच्या १७ महिन्यांच्या बालकासाठी खेळत आहेत.व्हिडीओमध्ये अयांश आणि त्याची आईही दिसत आहे. त्याच्या आई सांगत आहेत की, त्यांचा मुलगा हलूही शकत नाही. त्याला सात महिने झाले आहेत. डॉक्टरांनी या दुर्धर आजाराचे निदान स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफीअसे केले आहे. अयांश दोन वर्षांचा झाल्यावर त्याच्यावर उपचार सुरू होईल. त्यासाठी एकच औषध आहे परंतु ते जगातील सर्वात महाग इंजेक्शन आहे. त्याची किंमत १६ कोटी रुपये आहे. त्यातूनच त्याचे आयुष्य वाचू शकेल.

त्यानंतर अमिताभ म्हणत आहेत की, मला माहित नाही की हे मीआपल्याला सांगावे की नाही. परंतु, फराह यांच्या या मदतीमध्ये मी सुध्दा व्यक्तीगत स्वरुपात माझे योगाद देऊ इच्छितो. मात्र, मी किती रक्कम मदत म्हणून देणार आहे हे नंतर सांगेल.अमिताभ यांनी फराहे खान यांचे हात जोडूून आभारही मानले.

Amitabh Bachchan gets emotional after learning about 17-month-old boy’s illness

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण