वृत्तसंस्था
कोहिमा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारपासून दोन दिवसीय नागालँड दौऱ्यावर जाणार आहेत. सलग दोन दिवस ते जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. सोमवारी ते नागालँडमधील मोनमध्ये संबोधित करतील, तर मंगळवारी ते मेघालयातील शिलाँगमध्ये निवडणूक सभेला संबोधित करतील.Amit Shah’s road show in Nagaland today Will address BJP’s election rally in Mon, polls on February 27
नागालँडच्या 60 सदस्यीय विधानसभेच्या जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्याचा निकाल मार्चमध्ये लागणार आहे. भाजप नेते नलिन कोहलींच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही रॅली येत्या ४ ते ५ दिवसांत नागालँडमध्ये होऊ शकते.
नागालँडमध्ये सध्या नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीची सत्ता आहे. नेफियू रिओ हे मुख्यमंत्री आहेत. NDPP 2017 मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर एनडीपीपीने 18, तर भाजपने 12 जागा जिंकल्या. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी युती केली होती. सरकारमध्ये NDPP, BJP, NPP आणि JDU यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी दोन्ही पक्षांनी संयुक्त निवेदनात एनडीपीपी 40 आणि भाजप 20 जागांवर एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते.
या वर्षी 9 राज्यांमध्ये निवडणुका
2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांव्यतिरिक्त एकूण 9 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. ईशान्येनंतर आता कर्नाटकात एप्रिल किंवा मे महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. 40 सदस्यीय मिझोराम विधानसभेचा कार्यकाळही याच वर्षी 17 डिसेंबर रोजी संपत आहे. तर मध्यप्रदेश,छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामध्ये जानेवारी 2024 मध्ये वेगवेगळ्या तारखांना मुदत संपेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App